close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अशा पद्धतीनं करा देवाचा दिवा, घरात येईल आनंद

योग्यवेळी योग्य पद्धतीने दिवाबत्ती करणही महत्त्वाच मानलं जात. त्यामुळे दिवा लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया...

Updated: May 4, 2018, 07:49 AM IST
अशा पद्धतीनं करा देवाचा दिवा, घरात येईल आनंद

मुंबई : हिंदू शास्त्रानुसार पूजाअर्चा करताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात त्यामध्ये दिवाबत्ती करणं याचा समावेश होतो.पूजा करुन देवीदेवता प्रसन्न होतात अस म्हटलं जात. योग्यवेळी योग्य पद्धतीने दिवाबत्ती करणही महत्त्वाच मानलं जात. त्यामुळे दिवा लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया...

दिवा करताना तूपाचा वापर करण शुभ मानलं जात. पण इतर दिवशी तेलाचा उपयोग केला जातो. 

दोन वाती एकत्र करुनच दिवा करा. जर दिव्याच्या मध्यभागी असेल तरच एक वात चांगली दिसते. दोन वातींचा दिवा पुजा पूर्ण करते. 

जो दिवा तुम्ही लावताय त्याची वात अर्धवट जळालेली नको.वात थोडी वरच्या दिशेने खेचा. यामुळे दिवा संपूर्ण तेल संपेपर्यंत जळत राहतो. मध्येच दिवा जळायच थांबण शुभ मानलं जात नाही. खासकरुन पुजेच्या वेळी दिवा अर्धवट बंद होण अशुभ मानलं जात. 

बुझलेल्या वातीला इथेतिथे फेकण्याऐवजी जमिनीत फेका.  कचऱ्यात वात फेकणं शुभ प्रभाव संपवून टाकतो.