आजचे राशीभविष्य | गुरूवार | ०४ जुलै २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jul 4, 2019, 09:09 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरूवार | ०४ जुलै २०१९ title=

मेष- आर्थिक व्यवहारात समजदारीने काम करा. जीवनसाथी कडून घेतलेला सल्ला लाभदायक ठरू शकतो. पैसे कमावण्याचे नवे बेत आखाल. नोकरीमध्ये चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सल्ला इतरांना लाभदायक ठरू शकतो. 
 
वृषभ- विचार केलेली पूर्ण होण्याचे योग आहेत. नोकरी नाहीतर रोजच्या कामांमध्ये बदल करावा लागेल. खरेदी फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या योजना सर्वांना प्रभावीत करू शकतील. विद्यार्थांना यश मिळण्याची शक्यता आहे. धन लाभ सुद्धा होवू शकतो. 

मिथुन- नवीन प्रयोग कराल. आत्मविश्वास वाढेल.  नवीन करार किंवा नवीन संबंधांची शक्यता आहे. वेळ चांगला आहे. अनेक ठिकाणी आपण देखील सक्रिय व्हाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागतील. 
 
कर्क- प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. तुमच्या मतांनी समोरच्याचे मन जिंकाल. कुटुंबाला वेळ द्या.  विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवस उत्साहवर्धक राहील. घरगुती अडचणी कमी होतील. 
 
सिंह-  कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामामुळे सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुपित पणे तुमची मदत करेल. साथीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल.   

कन्या- ऑफिसमध्ये दिवस चांगला राहिल. करियर संबंधीत प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे समाधानी राहाल. कामामध्ये बढतीची शक्यता आहे. एखादी भेट मिळेल. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे खूष होतील. 
 
तुळ- व्यवसाय वाढेल. सहकार्यांकडून मदत मिळेल. खास लोकांसोबत मुलाखती होण्याची शक्यता आहे. रोजच्या कामामधून रिकामा वेळ मिळेल. मोठ्या प्रमाणात अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. अपूरी कामे पूर्ण होतील. 

वृश्चिक- कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामामुळे सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुपित पणे तुमची मदत करेल. साथीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल

धनू- अनेक समस्यांचे निराकरण होईल. गुंतवणूक केली असल्यास त्याचा फायदा होईल. नवीन भेटी होतील.  विद्यार्थीवर्गाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. काहीही बोलण्याआधी विचार करा. तुमच्या बोलण्याने वाद होण्याची शक्यता आहे.

मकर- आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस सामान्य असेल. पती-पत्नी मधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थांसाठी दिवस काही प्रमाणात नकारात्मक स्वरूपाचा असेल. वडिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.
 
कुंभ- आर्थिक अडचणी कमी होतील. उत्पन्न आणि खर्च सम प्रमाणात होतील. ऑफीसमध्ये अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. चांगल्या लोकांच्या संगतीचा परिणाम होईल. 

मीन- व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. साथीदारासह बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. खाजगी आयुष्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य राहील. डोक दुखीची समस्या जाणवेल. मतभेदांचा सामना करण्याची शक्यता आहे. 
डॉ. दिपक शुक्ला