मेष- काही कामांमध्ये अडचणी येतील. जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायात काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन चांगलं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ- जुन्या अडचणी दूर जाणार आहेत. व्यवसायात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी देखील चांगला दिवस आहे. स्वत:ची काळजी घ्या. कुटुंबाची काळजी घ्या. मित्रपरिवाराचं सहकार्य मिळेल.
मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादं असं काम कराल ज्याचा फायदा तुम्हाला दीर्घ काळासाठी मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आजचा दिवस आनंददायी असेल.
कर्क- अचानक होणारा धनलाभ सुखावह असेल. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह- अधिकारी वर्गाकडून सहकार्य कमी लाभेल. व्यवसायात निर्णय विचार करून घ्या. दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. अतिघाई करू नका. येणारा काळ चांगला असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. जमीन खरेदीचे निर्णय घ्याल. कौटुंबीक कार्यक्रमांमुळे आनंदी असाल. जुन्या समस्या, टेन्शन कमी होईल. स्वत: कडे लक्ष द्या.
तुळ- आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतीत. व्यवहार चातुर्याचा फायदा होईल. मनमिळाऊ स्वभाव तुम्हाला आनंद देऊन जाईल. उधार घेतलेले पैसे परत मिळतील.
वृश्चिक- धनलाभाची शक्यता आहे. अधिक काळ चालणाऱ्या कामातून फायदा होईल. नव्या विचारांवर योजना आखाल. तुमच्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र-कुटुंबियांची मदत मिळेल.
धनु- आज धीराने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांचा व्याप वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. विचार कमी करा.
मकर- एखादं महत्त्वाचं काम हाती घ्याल. जुनी कामं मार्गी लावाल. कामात तुम्हाला फायदाच होणार आहे. दिवस शांततेत व्यतीत होईल.
कुंभ- नोकरी, करियर, पैशांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नवी नोकरी किंवा प्रमोशनच्या प्रयत्नात असल्यास प्रयत्न सफल होऊ शकतात. उत्साही राहाल.
मीन- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती कराल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहा.