राशीभविष्य १९ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांनी दुसऱ्यांचे विचार समजून घ्या

काय म्हणतेय तुमची रास   

Updated: Jan 19, 2020, 07:48 AM IST
राशीभविष्य १९ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांनी दुसऱ्यांचे विचार समजून घ्या

मेष- नवीन अनुभव मिळतील. अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. स्पष्टपणे आपले मत इतरांपुढे मांडण्याचा प्रयत्न कराल. दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. 

वृषभ- दिवस चांगला असेल. पैश्याच्या व्यवहारांवर विशेष लक्ष द्या. अनेक अव्हानांचा सामना करावा लागेल. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आसाल. जुन्या नुकसानाची भरपाई होण्याची शक्यता आहे. भावंड आणि मित्र परिवाराकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन- व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांशी असणारे संबंध सुधारतील. कामाचे नवे प्रस्ताव तुमच्याकडे येतील. सरकारी कर्मचाऱ्यांची अडकलेली कामं पूर्ण होतील. साथीदाराची मदत मिळेल. 

कर्क-  अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामांचा फायदा मिळेल. दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. दिवस चांगला असेल. 

सिंह- आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी आपण खूप उत्साही होऊ शकता. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये चांगली प्रगती अपेक्षित आहे. आज तुम्हाला पैसे मिळवण्याची कोणतीही संधी मिळू शकते. पार्ट टाईम जॉब सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला असेल. 

कन्या- दिवस चांगला असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. खास व्यक्तिकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. अनेक समस्या सहज सुटतील. भागीदारी आणि दैनंदिन कामं पूर्ण करताना महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. दिवस चांगला असेल. अन्नाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.  

तुळ- दैनंदिन कामांमध्ये मन जास्त रमेल. लहानसहान गोष्टींवर चीडचीड केल्यामुळे गोष्टी बिघडू शकतात. अतिघाई करु नका. सावधगिरीने काम करा. दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांमुळे अडचणी येतील. 

वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी दिवस बेताचा असेल. प्रत्येकाशी संवाद साधताना विनम्रतेने बोला. भावना व्यक्त करण्यास संकोचू नका. कामं अपूर्ण असल्यामुळे तुमची चीडचीड होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. 

धनु- व्यापारात पैसे अडकतील. गुंतवणूकीच्या बाबतीत सावध राहा. आर्थिक गोष्टींमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक जबाबदारीकडे दुर्लक्ष करु नका. मानसिक तणाव आणि थकवा जाणवेल. 

मकर- नोकरीच्या ठिकाणी दिवस बेताचा असेल. प्रत्येकाशी संवाद साधताना विनम्रतेने बोला. भावना व्यक्त करण्यास संकोचू नका. कामं अपूर्ण असल्यामुळे तुमची चीडचीड होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. 

कुंभ- व्यवसायात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होईल. समस्या संपण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. फायदा होईल. दिवसभर थकवा वाटेल. आराम करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. 

मीन- घाईत कोणतंही काम करु नका. पैशांबाबत चिंता वाटेल. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिस, कामाच्या ठिकाणी तणावपूर्णस्थिती राहील. पोटासंबंधी दुखणी होऊ शकतात.