Diwali 2021 : का साजरा करतात वसुबारस, काय आहे त्यामागील कथा?

वसुबारसची ही कथा तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Nov 1, 2021, 12:47 PM IST
Diwali 2021 :  का साजरा करतात वसुबारस, काय आहे त्यामागील कथा? title=

मुंबई : हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरूवात होते. आज वसुबारस... आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसुबारस यामागे देखील एक कथा आहे. एक सासू, सुने आणि त्यांच्या गाईगुरांची ही कथा. या कथेतून सासूचं प्राण्यांवर असलेलं प्रेम याठिकाणी व्यक्त होतं  प्रत्येक खास दिवसामागे काही खास वैशिष्ट्य किंवा एखादा समज  असतो. 

वसुबारस यामागे देखील एक कथा 
पूर्वीपासून असं सांगितलं जातं की, एका गावात वृद्ध महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती. त्यांच्याकडे गाईगुरं होती. वृद्ध महिला सर्व गाईगुरांची विशेष काळजी घ्यायची. एके दिवशी काय झालं? आश्विन आला.. वृद्ध महिला पहिल्या दिवशी सकाळी शेताच्या दिशेने जायला निघाली. शेताच्या दिशेने निघताना सूनेला सांगून निघाली. मी शेतात जात आहे. तू माडीवर जा. गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं.

तेव्हा सून माडीवर आली. गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे काढून ठेवले. खाली आली तेव्हा वासरं खेळत होती. तेव्हा तिने वासरं ठार मारली.  त्यानंतर शिजवून सासूची वाट पाहू लागली. सासू  दुपारी घरी आली. सूनेने पान वाढलं. पानात मांस पाहिल्यानंतर तिने सूनेला काय म्हणून विचारलं. तेव्हा सूनेने सर्व काही सासूला सांगितलं. 

सासू तात्काळ उठली आणि देवघरात गेली आणि देवाची माफी मागितली.  म्हणाली, देवा सुनेच्या हातून चुक झाली आहे. तिला माफ कर.. माझी वासरं पुन्हा जिवंत कर. माझी वासरं जिवंत केली नाही तर मी संध्याकाळी स्वतः चे प्राण देईल...  असा निश्चय त्या वृद्ध महिलेने केला. महिला देवाकडे बसूनचं राहिली. संध्याकाळी गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या. 

देवाला काळजी वाटू लागली. वृद्ध महिला मागे हटणार नाही.. असं देवाला कळालं. त्यानंतर देवानं काय केलं?  देवाने गायींची सर्व वासरं जिवंत केली. वासरांचा आवाज  वृद्ध महिलेला ऐकू आला. वासरं त्यांच्या आईकडे गेली. दुध प्यायला लागली. वृद्ध महिलेला आनंद झाला. हे सर्व पाहून सुनेला देखील आश्चर्य वाटला. त्यानंतर वृद्ध महिलेने गाई-वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. तेव्हापासून वसुबारस हा सण साजरा करण्यात  येत असल्याचं सांगितलं जातं. 

वसुबारस फक्त गाय आणि तिच्या  वासरांसाठी नाही तर त्या प्रत्येक नात्यासाठी आहे. ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांबद्दल काळजी असते. यामध्ये आई-मुलं, गुरू-शिष्य, बहीण-भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा आहे.