Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Surya Rashi Parivartan 2023 : सूर्य देव 17 सप्टेंबरला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. अशात सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी सूर्य गोचर आयुष्याला ग्रहण लावणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 15, 2023, 12:16 PM IST
Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण title=
sun transit 17 september 2023 Surya Gochar 2023 Effects these 3 zodiac sign alerted next 30 days and Surya Gochar upay

Surya Gochar 2023 Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाचं लवकरच महागोचर होणार आहे. दर महिन्याला सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 17 सप्टेंबरला कन्या राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य देव कन्या राशीत 18 ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे पुढील 30 सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. काही राशींसाठी सूर्य गोचर शुभ आणि अशुभ ठरणार आहे. मात्र तीन राशींच्या आयुष्याला सूर्य गोचर ग्रहण लावणार आहे. या तीन राशीमध्ये तुमची रास आहे का, असल्यास करा हे उपाय. (sun transit 17 september 2023 Surya Gochar 2023 Effects these 3 zodiac sign alerted next 30 days and Surya Gochar upay)

'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण!

मीन (Pisces Zodiac)

सूर्य गोचरमुळे या राशींच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं गंभीर वादविवाद होणार आहे. तुमच्या घरावर पुढील 30 दिवस आर्थिक संकट कोसळणार आहे. अहंकारी लोक तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. तुम्हाला गंभीर मानसिक तणावाचा त्रास होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावही होणार आहे.

उपाय : बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कठीण प्रसंगी कोणाशीही चुकीचं बोलू नका. कार्य क्षेत्रात तुमच्या कामावर लक्ष द्या. ही वेळही निघून जाईल हे लक्षात ठेवा.

तूळ (Libra Zodiac)

सूर्य गोचर 2023 या राशींच्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. ज्यांना तुम्ही पैशांची मदत केली आहे, ते लोक गहाळ होतील. गुंतवणुकीतूनही तुम्हाला फटका बसणार आहे. व्यवसायिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. भागीदारी व्यवसायात भांडण होणार आहे. घरातही तणावाचं वातावरण असणार आहे. 

उपाय: 17 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कोणतीही मोठी गुंतवणूक करु नका. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बचत करा. पालकांची आरोग्य तपासणी करुन घ्या.  

हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : लालबागचा राजा किती बदलला? VIDEO तून पाहा राजाचा 90 वर्षांचा प्रवास

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीचा स्वामी शनि असून ज्याचा पिता सूर्यदेव आहे. पिता पुत्र हे कायम शत्रू असल्याने या राशींवर सूर्य गोचरचा अशुभ परिणाम होणार आहे. पुढील 30 दिवस कुठल्याही निर्णयात तुमचं नुकसान होणार आहे. घरात भावंडांशी वाद होणार आहे. तुमच्या आरोग्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम दिसणार आहे. 

उपाय: या 30 दिवसात शांत राहा. कोणाशीही भांडणे करु नका किंवा कठोरपणे बोलू नका. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)