Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 16, 2023, 07:13 PM IST
Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ title=
surya gochar 2023 making vashi rajyog Sun Transit these zodiac sign will be rich

Surya Gochar 2023 Vashi Rajyog Impact in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य गोचर केल्यामुळे दुर्मिळ असा राजयोग तयार होणार आहे. सूर्यदेव हा दर एक महिन्याने आपली स्थिती बदलतो.  सूर्य (Sun Transit) हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य गोचरला सूर्य संक्रांती असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं जात असून सूर्याचे संक्रमण वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत. 17 ऑगस्टला सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह (Singh Sankranti 2023) राशीचा स्वामी मानला जातो. सूर्य ग्रहाच्या या राशी बदलाचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडेल. सूर्य आणि चंद्र यांची भेट होणार असून शिवाय तर शुक्र सूर्यापासून 12 व्या घरात असून त्यातून वाशी राजयोग तयार होतो आहे. (surya gochar 2023 making vashi rajyog Sun Transit these zodiac sign will be rich) यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत सोन्याचे दिवस येणार आहे. 

'या' राशींना येणार सोनेरी दिवस

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना वाशी राजयोग फलदायी ठरणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. परदेशात वारीचा योग जुळून आला आहे. धार्मिक कार्याकडे तुमची रुची वाढणार आहे. एखादी तिर्थयात्रेलाही तुम्ही दर्शन देणार आहात.  मुलांकडून गोड बातमी समजणार आहे. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना वाशी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास या एक महिन्यात दिसणार आहे. धनलाभामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रगती आणि यशाचे तुमची वाटचाल सुरु होणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबात आनंदी दिवस पाहिला मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Shani Chandra Yuti 2023 : लवकरच कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती! 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना या महिन्याभरात पैसाच पैसा मिळणार आहे. हा राजयोग म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्ती ठरणार आहे. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्याचे पुढील एक महिना सोनेरी दिवस असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

वाशी राजयोगामुळे या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. प्रगती, यश, सन्मान आणि धनलाभाचे योग कुंडलीत जुळून आले आहेत. आनंदाचे हे दिवस तुम्हाला प्रसन्न करणारा ठरणार आहे. करिअरमध्ये उंच शिखर गाठणार आहे. आर्थिक बाजू तुमची भक्कम होणार आहे. वडिलांकडून धनलाभ होणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभणार आहे.  वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस असणार आहे. या एक महिन्यात तुम्हाला अनेक फायदे आणि लाभ होणार आहेत. 

हेसुद्धा वाचा -  Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)