Surya Gochar: 16 डिसेंबरला धनु संक्रांती, या दिवशी उपाय केल्याने मिळणार सूर्य बळ

Surya Gochar In Dhanu 16 December 2022: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हणून दर्जा आहे. ग्रहमंडळ सूर्याच्या अधिपत्याखाली असते आणि प्रत्येक ग्रहाला त्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. सूर्याच्या गोचराला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. 16 डिसेंबर 2022 रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करणार आहे. 

Updated: Dec 13, 2022, 02:02 PM IST
Surya Gochar: 16 डिसेंबरला धनु संक्रांती, या दिवशी उपाय केल्याने मिळणार सूर्य बळ title=

Surya Gochar In Dhanu 16 December 2022: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हणून दर्जा आहे. ग्रहमंडळ सूर्याच्या अधिपत्याखाली असते आणि प्रत्येक ग्रहाला त्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. सूर्याच्या गोचराला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. 16 डिसेंबर 2022 रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करणार आहे. या गोचर स्थितीला धनु संक्रांती असं संबोधलं जाईल.  या दिवसापासून खरमास सुरु होईल.  ज्योतिषांच्या मते या काळात विवाह, साखरपुडा, मुंडण अशी शुभ कार्य निषिद्ध मानली जातात. सूर्यदेव धनु राशीत 14 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील. त्यामुळे 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल. त्यानंतर शुभ कार्याला पुन्हा सुरुवात होतील. धनु संक्रांती काही उपाय केल्यास फलदायी ठरतात, चला जाणून घेऊयात...

- धनु संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करा आणि दान करा. या दिवशी गरीबांना अन्नदान, कपडे दान केल्यास पुण्य मिळतं.

- धनु संक्रांतीला सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि पूजा करा. तसेच या दिवशी भगवान शिवांचा गंगाजलाने अभिषेक करा. तसेच महामृत्यूंजय मंत्राचा जप करा.

-धनु संक्रांतीला भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीची पूजा करा. त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करा. यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच देवी लक्ष्मी घरात वास करेल.

बातमी वाचा- Shani Dev: गाडीच्या डिक्कीत या वस्तू ठेवता? लवकर काढा अन्यथा शनिदेवांची होईल अवकृपा 

-धनु संक्रांतीला मिठाचं सेवन करू नका. शक्य झाल्यास या दिवशी उपवास कराल. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पण करा. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल.

-धनु संक्रांतीला गायत्री मंत्राचा जाप करा. गायत्री मंत्राचं लघु अनुष्ठान म्हणजेच 24 हजार वेळा जप कराल. गायत्री मंत्रात खूप ताकद आहे. यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)