Surya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!

Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. 

Updated: Aug 9, 2023, 11:10 PM IST
Surya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार! title=
Surya Gochar

Sun Transit in Leo Date: सूर्याच्या संक्रमणामुळे राशींमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. येत्या 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्याचे हे संक्रमण काही रहिवाशांसाठी खूप शुभ राहणार आहे. या संक्रमणाच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. वैदिक ज्योतिषानुसार, सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानलं जातं. दर महिन्याला फक्त सूर्य बदलतो. सूर्य सध्या कर्क राशीत असून 17 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने अनेकांचं भाष्य उजळण्याची शक्यता आहे.

येत्या 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने त्याचा परिणाम सर्वच्या सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण त्यातील 3 राशींवर याचा खास परिणाम होईल...

सिंह राशी - कोणतीही गोष्ट हातात घेतली की पूर्णच होणार असल्याने तुमचा आत्मविश्वास सातव्या गगनावर जाऊ शकतो. तुमच्या खिशाचं वजन देखील वाढू शकेल. पगार वाढल्याने तुम्ही परिवारासह आनंदी असाल. त्यामुळे घरातील नातेसंबंधावर चांगला परिणाम होईल. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. मित्र तेवढे सांभाळा.

वृश्चिक राशी - सूर्य गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला व्यावसायात किंवा करियरमध्ये अच्छे दिन येऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर तुमची सर्व कामे होतील. तुमची दैनंदिन कामे पूर्ण होतील, यावर लक्ष द्या.

धनु राशी - तुम्हाला नेहमी असं वाटत असेल, की आपलं नशिबात काहीच नाही. तर थांबा...तुमचं  झोपलेलं भाग्य जागं होणार आहे.  व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहील. व्यवसायात प्रगती होईल. धनु राशीच्या लोकांना लव्ह लाईफमध्ये यश मिळू शकतं. फक्त वेळ सांभाळा. मुद्दाम कोणत्याही वादात पडणे टाळा, यामुळे तुमचाच फायदा होईल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )