मुंबई : घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणं शुभं मानलं जातं. धार्मिक मान्यतानुसार कासव भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. काही लोक सोन्याची किंवा चांदीची कासवाची अंगठी बोटात घालतात. काही लोक पंचधातूची करतात पण 12 पैकी 4 राशीच्या लोकांनी ही अंगठी घालू नये असं सांगितलं जातं.
कासवाची अंगठी बोटात घातल्याने शांतता, समृद्धी आणि आर्थिक स्थिती चांगली राहाते असं म्हटलं जातं. पण कोणत्या राशीच्या लोकांनी ही अंगठी घालू नये आणि काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या राशीच्या लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कासवाची अंगठी घालू नये. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येतील. करिअरमध्ये धोका निर्माण होऊ शकतो. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी नुकसान होऊ शकते.
सुख-शांती आणि समृद्धीचा भंग होऊ शकतो. त्यामुळे 4 राशीच्या लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हा निर्णय घ्यायला हवा. या राशीच्या लोकांनी कासवाची मूर्ती घरात ठेवली तरी चालेल.
कासवाची अंगठी बोटात घातल्याने अनेक समस्या सुटतात असा विश्वास आहे. आत्मविश्वास वाढतो आयुष्यातली नकारात्मकता दूर होते. यामुळे कुटुंबात शांतता राहाते. हरवलेलं सुख घरात परत येतं.