Vstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत

घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money) 

Updated: Feb 7, 2023, 07:15 PM IST
Vstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत

Vastu Tips for money : पैसे कोणाला नको असतात ? आपण सगळे मेहनत करतो ते पैसे कमवण्यासाठी. आपल्या कुटुंबियांना सुखी ठेवण्यासाठी. पण तुम्हाला माहित आहे का काही झाडं घरात लावली तर, कुटुंबात कधीही क्लेश होतं नाही, इतकंच काय पैशांची जराही चणचण भासत  नाही.  झाडांचे आपल्या आयुष्यातील हे सगळ्यांनाच माहित आहे. झाडापासून आपल्याला फक्त ऑक्सिजन मिळत नाही तर आपल्या घरातील सगळ्यात जास्त वस्तू या लाकडाच्या असतात. त्यात काही लोक आहेत ज्यांना गार्डनिंग करण्याची आवड असते. (Plants Used For Oxygan, Wood and Many things) मात्र, घरात कोणती झाड लावायला हवी हे कळत नाही. मग घरात अशी झाडं लावा जी वास्तुच्या दृष्टीनं शुभ मानले जातात. (Beautiful Plants) वास्तू नियमांनुसार, सुंदर झाडं देखील घचातील सकारात्यक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money) 

आपल्या प्रत्येकाच्या घराच्या गॅलरीत किंवा गार्डनमध्ये अनेक झाडे लावतो. (Keep Plants In Gallery Or in terrace) मात्र, जर तुम्हाला कुबेर देवाचा आशीर्वाद हवा असेल तर त्यांना प्रसन्ना करण्यासाठी कोणते झाडं लावायचे प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊया... यासाठी तुम्ही क्रासुलाचे झाड लावू शकता. (Crassula Plant) हे झाड घरात ठेवल्यात तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाहीत. पौराणिक मान्यतेनुसार, क्रासुलाचे झाड भगवान कुबेरला प्रचंड आवडते. घराच्या उत्तर दिशेला हे रोप लावल्यानं पैशांची कमी राहत नाही. इतकंच नाही तर क्रासुला झाड घरात लावल्यास व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राला मजबुत करण्यातचे काम करते. (Vastu Tips For Home) 

कोणत्या गोष्टींची घ्यायला हवी विशेष काळजी (How To Take Care Of Crassula Plant) 
1. क्रासुला झाड घरात अशा ठिकाणी लावा, जिथे जास्त अंधार नसेल. 
2.क्रासुला झाडाला वेळोवेळी पाणी शिंपडत रहाणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्यावर धुळ बसणार नाही. झाडाला देखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. 
3. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर कॅश काउंटरवर क्रासुलाचं रोप ठेवा. असे केल्याने कुबेरजींचा आशीर्वादानं बिझनसला लाभ होतो.
4. क्रासुला रोप घराच्या बाल्कनीत लावा किंवा टेरेसवर लावा. असे म्हटले जाते की या झाडाची जितकी काळजी घ्याल तितका भगवान कुबेराचा तुमच्यावर आशीर्वाद राहिल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)