२ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 2, 2020, 09:54 AM IST
२ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

मेष - नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. काम अधिक असेल. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. धनलाभाची शक्यता आहे. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. गुंतवणूकीबाबत विचार कराल. धार्मिक कामासाठी प्रवास होऊ शकतो. तब्येत चांगली राहील.

वृषभ - व्यवसाय चांगला राहील. रखडलेले पैसे मिळू शकतात. पैशांसंबंधी अधिक विचार कराल. आई-वडिलांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मदत मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

मिथुन - मनात सतत दुहेरी विचार सुरु असल्याने कामात मन लागणार नाही. महत्त्वाचा निर्णय घेणं कठीण होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. चिंता राहील. वाद-विवादापासून दूर राहा. कामात एकाग्रता नसेल. वायफळ अधिक खर्च होऊ शकतो. मानसिक ताण राहील. अधिक विचार न करणं योग्य ठरेल.

कर्क - नशिबाची आणि वेळची साथ मिळेल. कामात फायदा  होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मित्रांसोबत वेळ जाईल. 

सिंह - नवीन काम मिळू शकतं. कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. 

कन्या - व्यवसायात फायदा होऊ शकतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. काम वाढू शकतं. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळू शकतात. 

तुळ - तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वत:वरही नियंत्रण ठेवा. कामाबाबत नवा निर्णय घेऊ नका. थकवा जाणवेल. आराम करा. 

वृश्चिक - अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी स्थिती सुधारु शकते. आवडीच्या व्यक्तीच्या संपर्कात राहाल. खाण्या-पिण्याबाबतीत सावध राहा.

धनु - व्यवसायात नवीन योजना आखू शकता. नवीन कामाची सुरुवात करु शकता. जोडीदारासाठी खर्च करावा लागू शकतो. नोकरीत बदलीची शक्यता आहे.

  

मकर - प्रवासाचा योग आहे. नोकरीत प्रगती होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तब्येत चांगली राहील.  

कुंभ : नोकरीमध्ये उत्तम कामगिरी राहिल. बिझनेसमध्ये फायदा होण्याचा योग आहे. वरिष्ठांकडून मदत मिळेल. मुलाखत देण्याचा विचार असेल तर यश मिळेल. आज मन प्रसन्न राहिल. नोकरीमध्ये आणखी चांगलं काम होऊ शकतं. पैशांच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. एखादी खूशखबर ही मिळू शकेल. मनोरंजनात वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत मात्र सावध राहा.

मीन : तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. कामात लक्ष लागणार नाही. कामात कन्फ्यूजन वाढेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. काही जण तुमच्या कामाचं क्रेडिट घेण्याचं प्रयत्न करतील. तुमची स्थिती जाहीरपणे बोलवून दाखवू नका. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.