राशीभविष्य २४ जानेवारी २०२० : 'या' राशीच्या लोकांनी आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका

कसा आहे तुमचा आजचा दिवस...

Updated: Jan 24, 2020, 09:31 AM IST
राशीभविष्य २४ जानेवारी २०२० : 'या' राशीच्या लोकांनी आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका
फाईल फोटो

मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक संबंध छान राहतील. तुमची इमेज बदलण्याची संधी मिळेल. विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. दिवस उत्साही, मनोरंजनात्मक राहील. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्या. वैवाहिक आयुष्य सुखी राहील. प्रेम वाढेल. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो.

वृषभ - कामात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. मेहनतीनेच यश मिळेल. राहिलेली कामं पूर्ण होतील. वेळ चांगला आहे. अनेक कामात सक्रिय राहाल. दिवसभराच्या रुटीनमध्ये काही बदल करावे लागू शकतात. प्रवासाचा योग आहे.

मिथुन - घाई-गडबडीत कोणतंही काम करु नका. पैशांच्या बाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात एखाद्या गोष्टीवरुन समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तणावपूर्णस्थिती राहू शकते. 

कर्क - नोकरीत समस्या होऊ शकते. दररोजच्या कामात जोखीम वाटू शकते. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. अधिक विचारात वेळ वाया घालवू नका. अचानक अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. कामात अडचणी आल्यामुळे मूड बिघडू शकतो. तब्येतीत चढ-उतार राहील. 

सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी घडू शकतात. चांगल्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामात सन्मान मिळेल. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करु शकते. जोडीदाराची साथ मिळेल. 

कन्या - व्यवसायात वाढ होऊ शकते. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होईल. समस्या संपतील. थकवा जाणवेल. आराम करा. अन्यथा त्रास वाढू शकतो.

तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. यश मिळेल. नशिबाच्या साथीने कामं पूर्ण होतील. स्वत:च्या फायद्याची चिंता करा. इतरांना नाराज न करता कामं करा. जोडीदारासाठी खर्च होईल. जोडीदारावर राग व्यक्त करु नका, कोणावरही तुमच्या भावना थोपवू नका.

वृश्चिक - व्यवसायात फायदा कमी राहील. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. कामाच्या ठिकाणी लक्ष लागणार नाही. वायफळ गोष्टींमध्ये मन राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहू शकतो. जोडीदाराची काळजी घ्या.

धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुन निर्णय घ्या, फायदा होईल. पैशांच्या स्थितीत चांगला फायदा होईल. समाज, कुटुंबात तुमचं महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत संबंध अधिक चांगले होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश टाळा.

  

मकर - नवे व्यवहार शक्यतो टाळा. इच्छा नसतानाही पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या योजना गुप्त ठेवा. नात्यांमध्ये कठिण परिस्थिती येऊ शकते. वाद होऊ शकतात. डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते. 

कुंभ - आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीचा फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रयत्नांनी समस्या सुटू शकतात. 

मीन - व्यवसायात वाढ करताना सावधगिरी बाळगा. सध्या जे चालू आहे तसं चालू ठेवा. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. मोठा निर्णय होऊ नका. पैसे खर्च करताना विचार करा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि झोपेच्या कमतेरतेमुळे समस्या होऊ शकतात.