मेष - जर तुम्ही कोणत्या खास नात्यात तर आजचा दिवस तुम्हाला चांगला असेल. आजचा दिवस तुमचा आहे. एकमेकांसोबत वेळ घालवा. कामासाठी देखील आजचा दिवस अतिशय चांगला आहे. सहकार्यांकडून लाभ मिळेल.
वृषभ - आज तुम्ही अशा व्यक्तीला भेटाल जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आज सतर्क राहा. पहिला निर्णय घेण्यासाठी सज्ज व्हा. कधी कधी तुम्हाला पहिला प्रयत्न करावा लागेल. शारिरीक काळजी घ्या. आजचा दिवस थोडा हेकटिक असेल.
मिथुन - आजचा दिवस थोडा खराब असेल. जोडीदाराशी विचारपूर्वक वागा. जोडीदारावर विश्वास ठेवा, संशय घेऊ नका. कामावर लक्षकेंद्रीत करा, चांगला लाभ होईल.
कर्क - भूतकाळातील व्यक्ती आज पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट विचार न करता करू नका, त्याचा त्रास होईल. सहकार्यांकडून मदत मिळेल.
सिंह - तुमच्या कामात आजचा दिवस जाईल. त्यामुळे जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही. पण संपूर्ण लक्ष कामावर केंद्रीत करा, लाभ होईल. शरिराकडे लक्ष द्या, स्वास्थ बिघडण्याची शक्यता.
कन्या - प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या जोडीदारासोबत आज मतभेत होतील. पण दिवस संपताच सगळं विसरून जाल. कामात लक्ष द्या.
तूळ - कामात पॅशन ठेवा. कामावर प्रेम करा. कामात यश मिळेल. यामुळे वैवाहिक जीवनही चांगले राहिल. कामाचा ताण कमी झाल्यावर कुटुंबाकडे, जोडीदाराकडे लक्ष द्या. दिवस प्रेमाचा आहे.
वृश्चिक - लग्नाचा विचार करत असाल तर आजच्या दिवसांत कुणा खास व्यक्तीला भेटा. त्या व्यक्तीमध्ये रुची वाढेल. कामातून आनंद मिळेल. मनासारखं काम केल्याचं समाधान मिळेल. दिवस चांगला जाईल.
धनू - आजचा दिवस हा उत्साही, रोमांचक आणि आनंदी जाईल. आजच्या दिवसात काम देखील मनासारखं होईल. आणि जोडीदाराला देखील मनासारखा वेळ द्याल. नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा.
मकर - आजचा दिवस तुमचा आहे. जोडीदाराच्या शोधात असाल तर तो शोध आज संपेल. व्यवसायात किंवा नोकरीत आजचा दिवस थोडा खडतर असेल. पण दिवसाच्या शेवटी कामातून भरपूर आनंद आणि समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्याल.
कुंभ - आज तुम्ही प्रेम आणि दृढ विश्वासावर अवलंबून असाल. पण प्रेमात आज थोडी नाराजी स्विकारावी लागेल. काम मनाप्रमाणे कराल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता अधिक. शरिराकडे लक्ष द्या. आजूबाजूच्या बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता.
मीन - आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कामातून आनंद मिळेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा खडतर दिवस आहे. स्वास्थ चांगल असेल. पण लक्ष द्या. आजचा दिवस मस्त असेल.