मुंबई : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या काय सांगतंय आजचं राशीभविष्य. तुमचा आजचा दिवस कसा असेल, पाहा...
मेष- जास्त राग करुन फायदा नाही. स्वभावावर ताबा ठेवा. डोळ्यांना जास्त ताण देऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. एखाध्या धार्मिक स्थळावर भेट देण्याचा योग येईल.
वृषभ- आज तुम्हाला एकाच वेळी बऱ्याच कामांमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. मित्रमंडळींची भेट घेतल्यानंतर मन प्रसन्न होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन- आज तुमच्याकडून चांगल्या गोष्टींचं दान होणार आहे, यातूनच पुण्य कमवण्याची संधी आहे. महिलांनी घराची काळजी घ्या पाहुणे घराच्याच वाटेवर आहेत.
कर्क- नोकरीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत कराल.
सिंह- एखादी नवी आणि मोठी जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. शिवाय धनलाभाचाही योग आहे. मौल्यवान गोष्टींची खरेदी केल्यानंतर त्या गोष्टींची काळजी घ्या.
कन्या- शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या नव्या व्यक्तीची भेट होईल हीच व्यक्ती पुढे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
तुळ - तरुण पिढीनं अभ्यासावर आणि नोकरीच्या संधीवर लक्ष द्यावं. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. मोठ्यांशी बोलताना भान ठेवा.
वृश्चिक- चांगल्या कामांमुळं आज तुम्हाला पुरस्कृत केलं जाणार आहे. प्रवासयोग आहे. गावाकडची माणसं भेटतील.
धनु- व्यावसायिकांना आजचा दिवस फायद्याचा आहे. सहकाऱ्यांसोबतचे मतभेद दूर करा. यातच हित आहे.
मकर- अडकलेले पैसे परत मिळण्यापासून नफा होईपर्यंतचा प्रवास आज तुम्ही करणार आहात. धार्मिक कामांच्या निमित्तानं कुटुंबीयांशी चांगला संवाद साधाल. आजचा दिवस आनंदी आहे.
कुंभ- आईवडिलांचं आरोग्य उत्तम असेल. नोकरीच्या ठिकाणी नवे आणि प्रशंसनीय निर्णय घ्याल. प्रवासयोग आहे.
मीन- अती घाईमध्ये आज कोणतंही काम करु नका. आईवडिलांचा आशीर्वाद असेल, त्यामुळं येणारं प्रत्येक आव्हान तुम्ही जिंकणार आहात.