मेष- काही नवे अनुभव येतील. अनेक समस्यांवर तोडगा निघेल. तुमचे विचार आज आत्मविश्वासाने मांडू शकाल. इतरांचं म्हणणंही ऐकायचा प्रयत्न करा. कौटुंबीक नाती सुधारण्याला प्राधान्य द्या.
वृषभ- तुमच्यासाठी सध्याची वेळ चांगली आहे. आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्या. प्रत्येक आव्हानासाठी तयार रहा. नव्या गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. जुन्या एखाद्या गोष्टीची नुकसामभरपाई मिळेल.
मिथुन- आज स्वत: आखलेल्या बेतांवर विश्वास ठेवा. आर्थिक बाबतील चांगले प्रस्ताव समोर येतील. करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी आणि स्पर्धकांना यश मिळणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क- इतरांशी असणारे संबंध आणखी दृढ करण्याला आज प्राधान्य द्या. करिअरच्या दृष्टीने काही गोष्टींविषयी असणारी शंका दूर होईल. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे आनंदी व्हाल. कुटुंबात चांगलं वातावरण असेल.
सिंह- इतरांवर कुरघोडी करण्यासाठी उत्साही असाल. कितीही व्यग्र असाल तरीही कुटुंबातील व्यक्तींसाठी वेळ काढा. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये प्रगती होईल. पार्ट टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. शुभकार्यात सहभागी व्हाल.
कन्या- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला मिळेल. वयोवृद्ध व्यक्तीची मदत कराल. जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास जातील.
तुळ- एखाद्या कामासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. नवे अनुभव मिळतील. काही प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याचा योग आहे, जे करिअरच्या दृष्टीने मदतीचे ठरतील. व्यापारात एखादी चांगली संधी मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल.
वृश्चिक- अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने इतरांसमोर मांडू शकाल. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर असेल. एकट्यानेच सारी कामं पूर्ण करण्याची इच्छा होईल. वेळ तुमच्या कलाने आहे. या संधीचा फायदा घ्या.
धनु- मित्रांची मदत मिळेल. नवी माहिती मिळेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या खास वेळी खास ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळेल.
मकर- संधी मिळाल्यास आराम करा. एखाद्या योजनेवर काम करत आहात, तर त्यात सुधारणा होतील. व्यक्तीगत अडचणी दूर करण्याचा प्रयत्न असेल. नवी सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात यश मिळेल.
कुंभ- कायदेशीर बाबींमध्ये शुभवार्ता मिळेल. मित्रांसमवेत कामाचे बेत आखू शकता. लवकरच एखादा प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. वरिष्ठ तुमच्यामुळे आनंदी असतील.
मीन- विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्यत्न करा. तुमच्या विचारांशी इतरही सहमत असतील. प्रयत्न केल्यास एखाद्या खास व्यक्तिवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. आत्मविश्वास वाढलेला असेल.