close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | २९ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 29, 2019, 07:42 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | २९ ऑगस्ट २०१९

मेष- कोणा एकाच्या मदतीसाठी पुढाकार घ्याल. काहीजणांच्या उदार स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव असेल. समाजव्यवस्थेत काही बदलांची शक्यत आहे. 

वृषभ- नशिबाची साथ मिळू शकेल. पैसे कोणत्याही मार्गाने येऊ शकतात. साथीदारासोबत काही वेळ जरुर व्यतीत करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या योजना आखाल. नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडतील. 

मिथुन- आर्थिक बाबतील मदत मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. प्रयत्न कराल. कोणाचीतरी मदत करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध आणखी दृढ होऊ शकतात. वरिष्ठांशी केलेली चर्चा तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. 

कर्क- चांगल्या लोकांना भेटण्याचा योग आहे. मोठ्या योजनांवर चर्चा कराल. नोकरीचे नवे प्रस्ताव मिळतील त्यावर लक्ष द्या. नवे बेत आखा. सर्वांना सहकार्य करा. वैवाहिक जीवन चांगलं असेल. 

सिंह- आज तुम्ही जास्तीत जास्त सकारात्मक विचार कराल. आव्हानांचा काळ संपेल. धार्मिक कामांमध्ये रस असेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. 

कन्या- करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. कामाचा व्याप वाढलेला असेल. कुटुंबात एखादा आनंदाचा क्षण येईल. तुम्ही आनंदी असाल. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल. 

तुळ- नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. खरेदी करतेवेळी स्वत:वर ताबा ठेवा. कुटुंबात शांतता ठेवा, मांगलिक कामांमध्ये सहभागी व्हाल. 

वृश्चिक- मित्रांना भेटण्याची संधी मिळेल, त्यांची मदत होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी किंवा व्यवसायात फायदा होणार आहे. जबाबदारीवर लक्ष द्या. एखाद्या चांगल्या सवयीचा तुम्हाला फायदा होणार आहे. 

धनु- कामाच्या बाबतीत बरेच बारकावे टीपाल. नोकरीच्या ठिकाणी काही नव्या संधी मिळतील. साथीदाराची मदत मिळेल. शैक्षणिक आणि कायदेशीर कामं मार्गी लागतील. 

मकर- ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या मोठ्या निर्णयाच्या दिशेने जाल. अचानक करिअरशी निगडीत काही नव्या संधी मिळतील. इतरांच्या अनुभवाचा फायदा होईल. 

कुंभ- स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल कराल. काही खास विचार तुमच्यासाठी मदतीचे ठरणार आहेत. एखादी मोठी संधी मिळू शकते. पदोन्नतीच्या संधी मिळतील. प्रवासाचा विचार करा. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. 

मीन- दिवस चांगला आहे. काही कठिण कामं सोप्या पद्धतीने मार्गी लागतील. व्यापारात फायदा होणार आहे. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत कराल.