close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शनिवार | १७ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Aug 17, 2019, 09:35 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | १७ ऑगस्ट २०१९

मेष- बेरोजागारांना रोजगाराची संधी चालून येईल. नोकरीत प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. समाजातील मान वाढेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. काही लोक तुमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे कामात मन लागणार नाही. आपल्या मनातील गोष्टी जोडीदारापासून लपवू नका.

मिथुन- नोकरी आणि व्यवसायात कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. सकारात्मक विचार करा. नव्या वस्तुंची खरेदी करण्याचा योग संभवतो. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज.

कर्क- नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. आर्थिक आवक वाढेल. एखाद्या अर्धवट सोडून दिलेल्या कामात पुन्हा रस घ्याल. व्यवहारीपणा दाखवल्यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. 

सिंह- व्यवसायात नव्या योजना आखाल. बऱ्याच काळापासून रखडलेली येणी वसूल होतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवासाचा योग संभवतो. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव चालून येतील. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायाचे निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वादांचा सामना करावा लागेल. जवळच्या व्यक्तींशी संबंध अचानक बिघडण्याची शक्यता. वाहन जपून चालवा.

तूळ- कर्जातून मुक्ती मिळेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मेहनत करण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक. नवीन आणि सकारात्मक गोष्टी केल्यास जीवनात बदल घडेल. 

वृश्चिक- व्यवसायात फायदा होईल. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. भौतिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. जमीनजुमल्याचा व्यवहार होऊ शकतो. अचानक झालेल्या भेटीगाठींमुळे फायदा होण्याची शक्यता.

धनु- नोकरीत बढतीचा योग संभवतो. व्यवसायात पूर्ण लक्ष केंद्रित करा. नोकरी आणि व्यवसायातील जुन्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरणही चांगले असेल. रोमँटिक क्षण अनुभवायला मिळतील.

मकर- आर्थिक व्यवहारांमध्ये फायदा होईल. नव्या ओळखीमुळे लाभ मिळण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होईल. संसारातही सुखद घडामोडी घडतील. पचनाच्या त्रासामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता. 

कुंभ- व्यवसायात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न कराल. बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. निर्धारित कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थितीही सुधारेल. 

मीन- आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिनक्रम बिघडल्यामुळे आळस आणि थकवा जाणवेल. कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता. भावनेच्या भरात आर्थिक गुंतवणूक करणे टाळा.