'हे' 3 ग्रह करतात गरीब आणि कर्जबारी, आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय

 कुंडलीतील हे तीन ग्रह आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.

Updated: Aug 20, 2022, 06:47 PM IST
 'हे' 3 ग्रह करतात गरीब आणि कर्जबारी, आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय title=
trending news astro tips for money shani mangal and rahu spoil money and economic condition do these remedies in marathi

Grah Effect On Money: आयुष्यात खूप मेहनत करुनही अनेक लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा आर्थिक परिस्थिती इतके बिकट होते की लोक कर्जबाजारी होतात. व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह हे त्यांचा आयुष्यावर परिणाम करत असता. कुंडलीतील हे तीन ग्रह आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.

राहू 

वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला सावली ग्रह मानलं जातं. जर तुमच्या कुंडलीत राहू शुभ ग्रहांसोबत असेल तर त्याचा आयुष्यात चांगला परिणाम होतो. मात्र राहु अशुभ ग्रहांच्या सहवासात आला तर त्याचा परिणाम आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर होतो. 

उपाय - ऊँ रां राहवे नम:या मंत्राचा नियमित जप करा.

शनि

ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनी दीर्घकाळ राहतो. कुंडलीत शनी असणे म्हणजे तुमची साडेसाती सुरु आहे असं, ज्योतिष शास्त्रात म्हटलं जातं. असात आर्थिक स्थिती कमकुवत होते. तसंच वैवाहित जीवनात अडथळे येतात. 

उपाय - शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करा. तसंच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.शनिदोष टाळण्यासाठी घोड्याच्या बुटाची अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी.

मंगळ

हा सर्व ग्रहांमध्ये अग्निमय ग्रह मानला जातो. मंगळामुळे माणसाच्या आयुष्यात अशांतता निर्माण होते. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ सहाव्या, आठव्या आणि दहाव्या घरात असल्यास त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जर मगंळ हा सहाव्या घरात असेल तर तुमच्यावर कर्जाचे बोझे वाढते.

उपाय - मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार प्रवाळ रत्न धारण करावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)