Vaishakh Amavasya 2023 : वैशाख महिन्यातील अमावस्या यंदा खूप खास आहे. या अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. या अमावस्येला ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यास धनलाभ होईल असं सांगण्यात आलं आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, ध्यान-पूजा, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने मनुष्याचा सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी पितरांचीदेखील पूजा केली जाते. चला मग जाणून घेऊयात वैशाख अमावस्येची तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व..
यंदाची अमावस्या खूप खास आहे. कारण या दिवशी वर्षातील पहिलं सूर्यग्रहणदेखील आहे. वैशाख अमावस्या 20 एप्रिल 2023 गुरुवारी आहे. वैशाख अमावस्येला गायत्री मंत्राचा जप, पिंपळाची पूजा आणि श्राद्धा करण्याची परंपरा आहे. यादिवशी दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होते आणि सौभाग्य वाढतं.
पंचांगानुसार, वैशाख अमावस्या तिथी 19 एप्रिल 2023 ला सकाळी 11.23 वाजता सुरू झाला आहे आणि तो 20 एप्रिल 2023 ला सकाळी 09.41 वाजता संपणार आहे.
स्नान-दान मुहूर्त - सकाळी 04.23 ते सकाळी 05.07 वाजेपर्यंत
वैशाख अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रमुख देवतेला हात जोडा.
त्यानंतर घर स्वच्छ करुन गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करा.
त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करा.
पितरांना तर्पण अर्पण करा.
पूजेनंतर गरीब आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे.
यानंतर जठ शक्ती आणि भक्तीने दान आणि दक्षिणा द्या.
वैशाख अमावस्येला नियमानुसार पूजा केल्यास भक्तांवर भगवान विष्णूंचा आशीर्वादांचा वर्षाव होतो, अशी मान्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपय जाणकारांचा सल्ला घ्या.)