Masik Shivratri 2023 : आज वैशाख महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. खरं तर शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. आजच्या तिथीला भगवान शंकराचं लग्न माता पार्वती यांच्याशी झालं होतं. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि चांगला वर मिळवण्यासाठी हे व्रत महिला करतात. या शिवरात्रीला शुभ योग जुळून आला आहे. इंद्र योग आणि पंचक, भाद्र याच दिवशी आहे. अशा या व्रताचे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.
पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आज दुपारी 01:27 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल 2023, बुधवारी सकाळी 11:23 वाजता संपणार आहे. बुधवारी निशिता काल मुहूर्तामध्ये भगवान शंकराची पूजा करायची आहे.
शिवपूजा मुहूर्त - 18 एप्रिल 2023 रात्री 11:58 वाजता
19 एप्रिल 2023 सकाळी 12:42 वाजता
आजची वैशाख मासिक शिवरात्री खूप खास आहे. आज सर्वार्थ सिद्धी आणि इंद्र योगाचा संयोग जुळून आला आहे. अशा शुभ काळात शिवपूजेचे फळ पूर्णपणे मिळतं. आज सकाळी 05:53 ते 19 एप्रिल 2023 ला सकाळी 01:01 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. तर इंद्र योग 17 एप्रिल 2023 ला रात्री 09.07 वाजता सुरु झाला असून तो आज संध्याकाळी 06.10 वाजता संपणार आहे.
आजच्या शिवरात्रीवर पंचक आणि भाद्राची एकत्र सावली असणार आहे. आज दिवसभर पंचक राहणार असून भाद्रा दुपारी 01.27 ते रात्री 12:23 पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार यावेळी भद्राचा वास पृथ्वीवर असणार आहे. जेव्हा भद्रा पृथ्वीवर भ्रमण करतो तेव्हा पृथ्वीवरील लोकांसाठी तो अशुभ मानला जातो. पंचक आणि भद्रा या दोन्ही वेळात शुभ कार्या केले जात नाही. मात्र शिवाच्या उपासनेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीय. कारण शिव हे स्वतः मृत्यूमुखी आहेत. त्यांच्या उपासनेमध्ये अशुभ काळांचा प्रभाव होत नसतो, वैदिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
आज रात्री भगवान शिवाचा जलाभिषेक करावा
त्यानंतर 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम् हा जप करावा.
भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक करून मंत्रोच्चार केल्याने भक्तांना धन-समृद्धी आणि संतानसुख प्राप्त होते. अशी मान्यता आहे की, जो महाशिवारात्रीला जो जागरण करतो त्याचा आयुष्यात कधीही गरिबी आणि दुःख येतं नाही.