'ही' विहीर सांगते तुमच्या मृत्यूची तारीख! भारतातील भयानक विहीरबद्दल तुम्हाला माहितीये का?

भारतात एक अशी भयानक विहीर आहे, जी तुमच्या मृत्यूची तारीख सांगते. हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. हस्यमयी विहिरीबद्दल तुम्हाला माहितीये का?

नेहा चौधरी | Updated: Dec 4, 2024, 07:37 PM IST
'ही' विहीर सांगते तुमच्या मृत्यूची तारीख! भारतातील भयानक विहीरबद्दल तुम्हाला माहितीये का?  title=

देशभरातील लोकांमध्ये धर्मावर खूप श्रद्धा असून भारतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पौराणिक महत्त्व आहे. त्या पौराणिक स्थळांबद्दल त्यांच्याशी संबंधित अनेक कथा आपल्याला पाहिला मिळतात. खरं तर या गोष्टी पुस्तक आणि जास्त करुन तोंडी असतं. पण या कथाप्रमाणे काही खऱ्या झाल्या, तर लोक त्यावर जास्त विश्वास ठेवू लागतात. भारतात अशा अनेक रहस्यमय जागा आहे, ज्याबद्दल पौराणिक कथेत सांगण्यात आलंय.

उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये अनेक रहस्य आजही दडलंय. त्यातील एक आहे तुमचा मृत्यू सांगणारी विहीर. होय अगदी बरोबर वाचलं तुम्ही भारतातील उत्तर प्रदेशात एक अशी विहीर आहे, जी तुम्हाला मृत्यूबद्दल संकेत देते. ही विहीर वाराणसीमध्ये असून तिचे नाव चंद्रकूप आहे. धार्मिक लोकांसोबत स्थानिक लोकांची या विहीरवर खूप श्रद्धा आहे. 

देशविदेशातून अनेक लोक आजही ही विहीर पाहण्यासाठी येतात. वारासणीमध्ये चंद्रकुप विहीर काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे, जी सिद्धेश्वरी मोहल्लामध्ये बांधलेल्या सिद्धेश्वरी मंदिराचा एक भाग आहे आणि हे ठिकाण चंदेश्वर लिंगामुळे प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मानुसार, चंद्रेश्वर लिंग हे नऊ शिवलिंगांचा एक भाग आहे, ज्यांना नवग्रह शिवलिंग म्हणतात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळते. त्याचबरोबर शिवलिंगाची पूजा करून भाविक ही विहीर पाहण्यासाठी आवर्जून जातात. 

असे म्हणतात की चंद्रकुप एका शिवभक्ताने बांधला होता, ज्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवाने या विहीरीला आशीर्वाद दिला होता. तेव्हापासून ही विहीर लोकांना त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी सांगते. या मंदिरात पूजा केल्यानंतर लोकांनी या विहिरीतील पाणी प्यायल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. 

जर विहिरीत प्रतिबिंब दिसली नाही तर...

या रहस्यमयी विहीरीबाबत अशी मान्यता आहे की, ही विहीर तुम्हाला मृत्यूच्या तारखेचे संकेत मिळतात. असं म्हणतात की, जर तुम्ही या विहिरीत पाहिलं आणि तुमचं प्रतिबिंब दिसलं नाही तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये मृत्यू होतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)