Varuthini Ekadashi 2023 : भगवान विष्णूच्या वहार अवताराची पूजा करणारी आज वरुथिनी एकादशी. हे एकादशीचं व्रत हिंदू धर्मात फार महत्त्वाचं आहे. शास्त्रानुसार असं म्हणतात की, या दिवशी जल दान केल्यास मोठं पुण्य प्राप्त होतं. आज तीर्थस्नान, दान, उपवास आणि भगवान विष्णूच्या वहार अवताराची पूजा केली जातं. हे एकादशीचं व्रत करणे म्हणजे अन्नदान आणि कन्यादानातून जे पुण्य मिळते, दोन्हीचं एकत्र पुण्य या व्रतातून मिळतं. (varuthini ekadashi 2023 puja muhurat vrat parana time special yoga Daan significance and importance)
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशी तिथी 15 एप्रिल 2023 ला रात्री 08.45 वाजता सुरू झाली आहे. आज म्हणजे रविवारी 16 एप्रिल 2023 ला संध्याकाळी 06.14 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी 07.32 ते 10.45 पर्यंत श्री हरी पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे.
हे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला केलं जातं. वरुथिनी एकादशी व्रताचे पारण सोमवारी 17 एप्रिल 2023 ला सकाळी 05.54 ते 08.29 या वेळेत करायचं आहे.
वरुथिनी एकादशीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या एकादशीनिमित्त त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. हा योग 17 एप्रिल म्हणजे सोमवारी पहाटे 4.07 ते पहाटे 5.54 पर्यंत असणार आहे. त्रिपुष्कर योग अतिशय शुभ मानला जातो. या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचे अच्छे दिन येणार आहे.
आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला.
मग मंदिरात जाऊन व्रताचा संकल्प घ्या.
भगवान विष्णूला चंदन, अक्षत, फुलं आणि फळं अर्पण करा.
भगवान विष्णूला पंचामृत अर्पण करा.
आता मधुराष्टकचा पाठ करा.
भगवान विष्णूच्या हजार नामांचा जपही करा.
पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
आजच्या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाणी दान करा.
उपवास करणाऱ्या लोकांनी या दिवशी फक्त फळं ग्रहण करावीत.
स्कंद पुराणानुसार, वरुथिनी एकादशीला सौभाग्य देणारी एकादशी मानली जाते. या दिवशी श्रीकृष्णने अर्जुनाला सांगितलं होतं की, वरुथिनी एकादशीच्या दिवशी उपवास करणार्याला दहा हजार वर्षे अन्नदान आणि तपस्याचं फळ मिळणार.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)