Shukra Shani Gochar 2023: नोव्हेंबर महिना सुरू होणार असून या महिन्यात अनेक ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत. यामध्ये अनेक मोठे ग्रह गोचर करणार आहेत. ग्रहांच्या या गोचरचा परिणाम इतर राशींच्या व्यक्तींवर देखील होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचं गोचर होत आहे आणि त्यासोबतच शनिही मार्गस्थ होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबर महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी राहू-केतूचे संक्रमण होणार आहे. नोव्हेंबरमध्ये शुक्र गोचर करणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.
शुक्र आणि शनीच्या राशी बदलामुळे नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी वृषभ राशीचे लोक मौजमजा करणार आहेत. नोव्हेंबर महिना या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. या काळात जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. शिवाय प्रलंबित पैसेही वसूल होणार आहेत. काही चांगली बातमी तुमच्या कानावर पडणार आहे. केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना शुभ परिणाम देणारा ठरणार आहे आहे. या कालावधीत तुम्हाला रखडलेले पैसै मिळू शकतात. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी नांदेल. राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे. तुम्हाला परदेशातून आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेत यश मिळेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येणार आहे. यावेळी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. या काळात अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. कामाचे वातावरण चांगले राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.