तुमच्या शरीरावर भगवान श्रीकृष्णासारख्या खुणा असतील तर तुम्ही खूप लकी, पैशांची कधीच चणचण भासणार नाही

धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाच्या शरीरावर अनेक शुभ चिन्हे होती. जर ही चिन्हे एखाद्याच्या शरीरावर असतील तर ती व्यक्ती खूप भाग्यवान अस

Updated: Aug 19, 2022, 02:27 PM IST
तुमच्या शरीरावर भगवान श्रीकृष्णासारख्या खुणा असतील तर तुम्ही खूप लकी, पैशांची कधीच चणचण भासणार नाही title=

मुंबई: धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाच्या शरीरावर अनेक शुभ चिन्हे होती. जर ही चिन्हे एखाद्याच्या शरीरावर असतील तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. तसेच हस्तरेषा, शरीरावरील तीळ, शरीराची बांधणी ज्या प्रमाणे व्यक्तीच्या भविष्याबाबत बरेच काही सांगतात. त्याच प्रमाणे शरीरावर जन्मतः असलेल्या खुणा (Birth Mark) देखील विशेष संकेत देतात. आज तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या खुणांबाबत सांगणार आहोत. 

शंख- हिंदू धर्मात शंख अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यावर शंखाची खूण होती असेही मानले जाते. यासोबतच त्यांनी हातात शंखही धरला आहे. ज्यांच्या तळहातामध्ये किंवा तळव्यामध्ये शंख आहे ते खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळते.

अर्धचंद्र - शास्त्रानुसार श्रीकृष्णाच्या तळव्यामध्येही अर्धचंद्र होते. भगवान शिव देखील कपाळावर अर्धचंद्र धारण करतात. ज्या लोकांच्या अंगावर अर्धचंद्राची खूण असते, ते जीवनात उंची गाठतात.

माशाची खूण- श्रीकृष्णाच्या तळहातावर आणि तळव्यावरही माशासारखे चिन्ह होते. ज्यांच्या अंगावर माशाची खूण असते, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते. या लोकांकडे भरपूर पैसा असतो, त्याचप्रमाणे त्यांना खूप प्रतिष्ठाही मिळते.  

बाण- बाणाचे चिन्ह असणे देखील खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना संघर्ष करावा लागतो पण ते जीवनात खूप यश मिळवतात.  

हातावर तीळ- हातावर तीळ असणे खूप चांगले मानले जाते. असे लोक कठोर परिश्रम करून श्रीमंत होतात. काही लोकांना वारसाहक्काने भरपूर संपत्तीही मिळते. असे लोक सुखी वैवाहिक जीवन जगतात.