Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 27 may to 2 june 2024 : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे तीन राजयोग निर्माण होणार असून याचा फायदा काही राशींना होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.   

नेहा चौधरी | Updated: May 27, 2024, 12:15 AM IST
Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? title=
weekly horoscope 27 may to 2 june check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Horoscope 27 may to 2 june 2024 in Marathi : मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्ज्ञानुसार अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग हा अनेक राशींसाठी तिप्पट लाभ होणार आहे. असा अतिशय लाभाचा हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी कसा असेल याबद्दलच भाकीत ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांनी केलंय.

मेष (Aries Zodiac)  

हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. तुमचा विश्वासातील माणूस तुमच्याशी खोटं बोलणार आहे. रागाने वागणे तुमच्या नात्यासाठी घातक ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधरेल पण खर्चही तेवढाच होणार आहे. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य लाभणार आहे. सुख-समृद्धीचे परिमाण निर्माण होणार असून प्रवासातून यश मिळणार आहे. प्रेम संबंधांमध्ये अस्वस्थता वाढणार आहे. तुम्ही बराच वेळ घराबाहेर राहिल्यामुळे मन अस्वस्थ असणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. 

शुभ दिवस: 29, 30,31

वृषभ (Taurus Zodiac) 

तुमच्यासाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. जास्त खर्च टाळण्यासाठी मित्रांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताच ठरेल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. सासरकडून आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. सध्या सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना आराम मिळणार आहे. व्यवसायात निर्णय घेण्यापूर्वी नीट विचारपूर्वक काम करा. वैवाहिक जीवनात सामान्यता असणार आहे. प्रेम भागीदारीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रवासातून यश मिळणार असून शुभ संयोग घडणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्ये असणार आहात. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. कुटुंबात सामान्य परिस्थिती असणार आहे. 

शुभ दिवस: 27,30

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या खाली जन्मलेल्या लोकांनी या आठवड्यात मध्यम असणार आहे. भौतिक वस्तूंवर जास्त खर्च होणार आहे. या आठवड्यात आवक संमिश्र असणार आहे. पोटाच्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. व्यवसाय चांगला होणार आहे पण कर्ज घेणं टाळा. वैवाहिक जीवनात चढ-उतार येणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. भागीदारीत केलेल्या कामामुळे त्रास होणार आहे. तब्येत सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. 

शुभ दिवस: 27,28,29

कर्क (Cancer Zodiac)   

या राशीसाठी हा आठवडा असामान्य असणार आहे. काम सुरू करण्यापूर्वी चांगले नियोजन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जास्त ताण आणि चिंता आरोग्यावर परिणाम करेल. मालमत्ता खरेदी करु नका तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणाकडून पैसे उधार घेऊ नका. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. नोकरदार लोक निरुपयोगी कामं करत राहणार आहे. आर्थिक बाबतीत यश मिळणार असून गुंतवणुकीतून फायदा होणार. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखणार आहात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक काही प्रतिकूल बातम्यांना सामोरे जावे लागणार आहे.

शुभ दिवस: 27,29,30

सिंह (Leo Zodiac) 

या आठवड्यात तुमच्या आक्रमकतेमुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही कर्जाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे हिताच ठरेल. या आठवड्यात उत्पन्नात चढ-उतार पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात पाठदुखी होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी आता मेहनत करावी लागणार आहे. व्यवसायात घाईमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईमुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना भाग्य साथ देणार आहे. तुम्ही कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. कोणत्याही गुंतवणुकीबद्दल तुमचं मन चिंतेत असले तरी आर्थिक बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे व्यवहारी राहिल्यास बरे होणार आहे. 

शुभ दिवस: 27,29

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीसाठी हा आठवडा मध्यम असणार आहे. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. व्यवसायासाठी वेळ वाईट असणार आहे. वैवाहिक जीवनात सातत्य कमी असणार आहे. प्रेमळ जोडपे आता आनंदी असणार आहात. कन्या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, मातृस्त्रीच्या सहकार्याने जीवनात सुख-समृद्धी लाभणार आहे. या आठवड्यात कोणतीही निराशा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करेल. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती बदलेल, तुम्हाला आनंद आणि समृद्धीच्या अनेक संधी मिळणार आहेत.

शुभ दिवस: 27, 30

तूळ (Libra Zodiac)  

या राशीत जन्मलेल्यांसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. तुमचे शेजारी तुम्हाला मदत करणार आहेत. मित्रांची साथ लाभणार आहे. नोकरी, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी आठवडा लाभदायक असणार आहे. हा आठवडा आर्थिक बाबींसाठी कठीण आणि खर्चिक ठरणार आहे. या आठवड्यात, तुम्हाला प्रवासातून मध्यम यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी असणार आहे. 

शुभ दिवस: 29, 30

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या राशीच्या लोकांना या आठवड्यात संघर्ष करावा लागणार आहे. तुमच्या कामात सातत्य नसल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडणार आहे. मानसिक तणावामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आतड्यांसंबंधी रुग्णांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात मतभेदही होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. 

शुभ दिवस: 27,29,30

धनु (Sagittarius Zodiac) 

 तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करणार आहे. आर्थिक व्यवहारांना अंतिम रूप दिल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक करण्याची ही वेळ योग्य नाही. लग्नात गोडवा असणार आहे. या आठवड्यात प्रेमाचे नवीन प्रयोग करणे टाळा. धनु राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक असणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असणार आहात. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा अनुकूल असेल. प्रवासातही तुम्हाला यश मिळणार आहे. कुटुंबात अहंकाराचा कलह टाळलात तर हिताच ठरेल. 

शुभ दिवस: 26,27,30

मकर (Capricorn Zodiac)  

या राशीत लोकांसाठी हा आठवडा काहीसा फलदायी ठरणार आहे. बौद्धिक श्रमातून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व लोकांमध्ये प्रस्थापित करणार आहात. या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोणत्याही फर्ममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घेणं हिताच ठरेल. मकर राशीच्या लोकांसाठी आठवडा आदराने भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. ऑफिसमध्ये तरुणांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

शुभ दिवस: 28,30

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर असणार आहे. कर्ज मागणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणे हिताच ठरेल. तुमची आंतरिक शक्ती तुम्हाला कामावर चांगला दिवस घालवण्यास मदत करणार आहे. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढणार आहे. त्वचाविकारांची समस्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कुंभ राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही मान-सन्मान वाढणार आहे. आर्थिक बाबींमध्ये अनेक बदल होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, पोटाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता आहे.

शुभ दिवस: 27,30

मीन (Pisces Zodiac)  

या राशीत लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. सासरच्या मंडळीत आनंदाचे वातावरण असणार आहे. काम करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या शक्यता आहे. तुमच्या घरात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. बाहेरची कामे तुमच्यासाठी चांगली परिणाम घेऊन येणार आहे. या आठवड्यात उत्पन्न चांगले असणार आहे. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम वाढणार असून ते मजबूत होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. कामाच्या ठिकाणी सुधारणा होणार आहे. 

शुभ दिवस: 29,30

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)