Weekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक

Love Horoscope February  :  फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो.  तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या.       

Updated: Jan 29, 2023, 08:59 AM IST
 Weekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक
Weekly Love Rashifal February 30 january to 5 february 2023 weekly love life horoscope astroyogi marathi news

Love Horoscope February 2023  : जानेवारी महिना संपायला तीन दिवस राहिले आहेत आणि आता प्रेमाचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना सुरु होणार. तरुणाईसाठी हा महिना खूप खास (Valentine's day) असतो. प्रत्येक प्रेम करण्यासाठी हा महिना अनेक रोमँटिक (Romantic) क्षण घेऊन येतो. प्रेमी युगुल असो किंवा नवरा बायको असो त्यांचासाठी हा आठवड्या कसा असेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  या आठवड्यात प्रेमाचा कारक शुक्र शनीच्या बरोबर कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे लव्ह लाइफ (Love life), रोमान्स (Romance) आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, ते पाहूयात. (Weekly Love Rashifal February 30 january to 5 february 2023 weekly love life horoscope astroyogi marathi news)

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमप्रकरणाच्या बाबतीत थोडा कठीण जाईल. या आठवड्यात तुम्हाला थोड्या कठीण काळातून जावं लागेल, कारण परिस्थिती तुमच्या अपेक्षेनुसार राहणार नाही. मात्र या आठवड्याच्या शेवटी वेळ बदलणार आहे. जीवनात आनंद समृद्धीचा योग येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा निर्णयही घेऊ शकता.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात या आठवड्यात खूप उत्साह असेल. परस्पर प्रेम देखील दृढ होणार आहे. तुमचा जोडीदार आणि प्रियजनांच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ घालवाल. मन प्रसन्न राहील आणि लव्ह लाइफ रोमँटिक राहणार आहे. 

मिथुन (Gemini)

या आठवड्यात प्रेमसंबंधांच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी अहंकारामुळे भांडण टाळावे. तर तुमच्या लव्ह लाइफ चांगल जाईल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी जरी सर्व काही चांगले दिसत असले तरी मन एखाद्या गोष्टीबद्दल उदास राहू शकतं. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमप्रकरणात वेळ रोमँटिक असेल आणि परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. तुमच्यापैकी काहींसाठी विवाह योग असणार आहे.  प्रेम जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ संयोग येणार आहेत. 

सिंह (Leo)

सिंह राशीचे लोक या आठवड्यात प्रेमसंबंधात आनंदी राहतील आणि जीवनात संतुलन राखून पुढे गेल्यास त्यांना अधिक आनंद मिळेल. तुमच्या प्रेमप्रकरणासाठी हा आठवडा आनंददायी आहे. 

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात अपेक्षित यश मिळत नाही. आठवड्याच्या शेवटी, वाद चर्चेने सोडवली तर बरं होईल.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणात जास्त अस्वस्थ वाटेल. प्रेम मजबूत करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बाजूने प्रयत्न करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धीचा योग येईल आणि परस्पर प्रेमही जागृत होईल. जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न राहील.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधांच्या बाबतीत काळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेमही दृढ होईल. तुमच्या दोघांमध्ये चांगली समजूतदारपणा निर्माण होईल आणि जीवनात आनंद दार ठोठावेल. 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनी प्रेमप्रकरणात निष्काळजीपणा दाखवला नाही तर जीवनात आनंद राहील. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्ही तुमच्या प्रेमप्रकरणाबद्दल खूप जागरूक असाल आणि तुमच्या प्रेम जीवनातही खूप व्यस्त असाल.

मकर (Capricorn)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधातील अस्वस्थता वाढत. शिवाय परस्परांमधील अंतरही वाढू शकतं. काही नुकसान होण्याची शक्यता असल्याने तुम्ही थोडं सावध राहावं. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीचे लोक या आठवड्यात आपल्या जोडीदारासोबत खरेदीच्या मूडमध्ये घराच्या सजावटीसाठी जाऊ शकतात. यातून परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. मात्र सप्ताहाच्या शेवटी थोडी काळजी घेऊन पुढे जावे लागेल आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधात अधिक अस्वस्थता राहील. लव्ह लाइफमध्ये परस्पर प्रेमात आंबटपणा वाढेल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात थोडी शांतता ठेवून कोणताही निर्णय घ्यावा लागेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)