Horoscope Money Weekly : बुध वक्रीमुळे 'या' आठवड्यात काही राशींचे सुवर्ण दिवस! पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Career Horoscope 21 to 27 August : ग्रहांचा राजकुमार बुध या आठवड्यात सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी हा आठवडा सुवर्ण काळ असणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य  

नेहा चौधरी | Updated: Aug 21, 2023, 08:02 AM IST
Horoscope Money Weekly : बुध वक्रीमुळे 'या' आठवड्यात काही राशींचे सुवर्ण दिवस! पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य title=
weekly money career horoscope 21 to 27 august 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Budh Vakri 2023

Horoscope Money Weekly (21 - 27 August 2023)  : बुध्दिचा कारक ग्रहांचा राजकुमार या आठवड्यात वक्री स्थितीत असणार आहे. मेष आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा अतिशय शुभ योग जुळून आला आहे. त्याशिवाय इतर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (weekly money career horoscope 21 to 27 august 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Budh Vakri 2023)

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये प्रगती घेऊन आला आहे. एखाद्या महिलेमुळे तुम्हाला मदत होणार आहे. या आठवड्यात तुमचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराकडे लक्ष द्या. आरोग्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. घरातील एखाद्या कार्यात तुम्ही बिझी असणार आहे. प्रिय व्यक्तींबरोबर आनंददायी क्षण घालविणार आहात. प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी मनं प्रसन्न असेल. 

शुभ दिवस: 22, 23, 25

वृषभ (Taurus) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणार होणार आहे. तरुणांच्या मदतीने कामात यश प्राप्त होणार आहे. प्रवासातून यश लाभणार आहे. कार्यक्षेत्रात हवे तसे बदल दिसून येतील. या आठवड्यात खर्च अधिक होणार आहे. कुटुंबातील जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करणार आहे. तुमची फसवणूक होणार आहे. 

शुभ दिवस: 22, 24

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आठवडा आहे. समाजात तुमचा आदर आणि सन्मान वाढणार आहे. मातृसत्ताक महिला आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात या आठवड्यात यश मिळणार आहे. प्रकल्पात प्रगतीचं उंच शिखर तुम्ही गाठणार आहात. प्रवासातून आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिक लाभाचा हा आठवडा आहे. सुख समृद्धी तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे. 

शुभ दिवस: 21, 24

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात चांगले दिवस असणार आहे. तुमच्या कार्यशैलीतही बदल होणार असल्याने तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे. हा आठवडा आर्थिक बाबींसाठीही चांगल असणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. हा आठवडा प्रेम जीवनसाठी शुभ ठरणार आहे. प्रवासातून मात्र नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती चांगली असेल. 

शुभ दिवस: 21, 25

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा आर्थिकदृष्ट्या शुभ असणार आहे. संपत्तीत वाढणार आहे. भविष्यासाठी गुंतवणुकीत करणार आहात. या आठवड्यात प्रवासातूनही शुभ परिणाम आणि यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात ज्येष्ठ व्यक्तीमुळे अडचणी वाढणार आहे. मतभेद होणार असल्याने चर्चेने सोडवा. आठवड्याच्या शेवटी मनं चिंतेत असणार आहे. 

शुभ दिवस: 22, 24

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदी असणार आहे. प्रवासातून मन प्रसन्न होणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत प्रवासाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात मात्र मन तणावपूर्ण असणार आहे. आठवड्यात तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. त्यामुळे सकारात्मक वाटणार आहे. कौटुंबिक गोष्टींमुळे मन अस्वस्थ असणार आहे. आर्थिक तंगीचाही सामोरे जावं लागू शकतं. 

शुभ दिवस: 22, 24

तूळ (Libra)

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.  आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदी क्षण घालवणार आहात. या आठवड्यातील प्रवासातूनही शुभ लाभ होणार आहे.  या आठवड्यात आर्थिक खर्चही उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीचा सुंदर योग जुळून आला आहे. 

शुभ दिवस: 23, 24, 25

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. एखाद्या महिलेकडून आर्थिक मदत होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि यश प्राप्त करणार आहात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम अधिक वाढणार आहे. या आठवड्यातील प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी जरा मन अस्वस्थ होणार आहे. 

शुभ दिवस: 22, 23

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. तुमचा मान-सन्मानही वाढल्यामुळे मन प्रसन्न असणार आहे. हा आठवड्या तुमच्या बाजूने असणार आहे. आर्थिकदृष्ट्याही हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यातील प्रवास मात्र पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय तुमच्या हिताचे ठरणार आहे. 

शुभ दिवस: 21,25

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना याआठवड्यात भाग्यची साथ मिळणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक लाभासोबत बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात. अधिक प्रेम आणि सुसंवाद वाढणार आहे. प्रेमप्रकरणात हा आठवडा रोमँटिक असणार आहे. वडीलधारी मंडळीकडून मदत होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही बिझी असणार आहात. 

शुभ दिवस: 24, 25

कुंभ (Aquarius) 

या राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती आणि मान-सन्मानही घेऊन आलेला आहे. तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहेत. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ आणि लाभदायक असणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामावर लक्षकेंद्रीत करा. सुंदर भविष्यासाठी या आठवड्यात तुम्ही काही ठोस निर्णय घेणार आहात. प्रवासातून यश आणि प्रगती प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मनं प्रसन्न आणि सकारात्मक असणार आहे. 

शुभ दिवस: 23, 24, 25

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. या आठवड्यात हाती घेतलेले प्रकल्प दीर्घकाळ तुम्हाला लाभ देणार आहात. आर्थिक प्रगतीसाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. प्रेमसंबंधात विचारपूर्वक आणि चर्चेने निर्णय घ्या.  या आठवड्यात तुमचा पार्टीचा मूड असणार आहे. आरोग्यासाठी खर्च होणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद तुमच्या दारावर येणार आहे. 

शुभ दिवस: 26, 27

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)