Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य यांनी पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितलं आहे. आपल्या जीवनाचा मार्ग कितीही खडतर असला तरी जोडीदार खरा आणि साथ देणारा असेल तर व्यक्तीचे, विशेषत: महिलांचे आयुष्य खूप चांगले जाते. मुली सगळ्या गोष्टी कोणाला सांगत नाहीत पण त्यांना जे पुरुष आवडतात त्यांच्याशी त्या सर्व शेअर करतात. मुलींना त्यांच्या जोडीदारांनी त्यांचं ऐकावं असे वाटतं, स्त्रियांना असे पुरुष आवडतात.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये स्त्रीला जीवनात कोणत्या प्रकारचा सोबती असावा यासंबंधी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या कृतीतून आणि वागण्यातून ओळखलं जाऊ शकतं. प्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की, तिचा जोडीदार केवळ दिसायलाच चांगला नसावा तर त्याच्या सवयींनीही मन जिंकले पाहिजे.
चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्यात, ज्या पाहून स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते. पुरुष किंवा उत्तम जोडीदारामध्ये मुली/स्त्रिया नेमकं या नोटीस करतात हे आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे.
चाणक्य यांनी पुरुषांसाठीच्या धोरणात सांगितलं आहे की, मुली प्रामाणिक असलेल्या पुरुषाकडे आकर्षित होतात. स्त्रियांना चांगल्या मनाचे पुरुष खूप आवडतात. स्त्रिया आणि मुलींचा असा विश्वास असतो की, प्रामाणिक पुरुष कधीही त्यांच्या भागीदारांना फसवत नाहीत.
काही पुरुष त्यांच्या पार्टनरशी उद्धटपणे बोलतात. त्याचबरोबर काही पुरुष असेही असतात जे नेहमी इतरांना मदत करतात आणि आपल्या गोड बोलण्याने इतरांची मनं जिंकतात. पुरुषांची ही गोष्ट मुली/स्त्रियांना पटकन प्रभावित करते. पुरुषांचे इतरांशी चांगले वागणे मुलींना आकर्षित करते.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की स्त्रिया जास्त बोलतात. अशा स्थितीत तिच्या जोडीदाराने तिचं बोलणं आरामात ऐकावं असे महिलांना नेहमीच वाटतं. मुली सगळ्या गोष्टी कोणाला सांगत नाहीत पण आवडत्या पुरुषासोबत सर्व गोष्टी शेअर करतात. त्यामुळे एकंदरीत महिलांना त्यांचं ऐकून घेणारे पुरुष प्रचंड आवडतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्यांच्या नीती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )