Yamdeepdan 2023 : संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्यादिवशी यमराजाची पूजा केली जाते. दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. यादिवशी यमराजाला दिवा दान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवं दान करतात. (yamdeepdan on Dhanteras diwali 2023 yamdeepdan done prevents premature death and yamdeepdan history and significance How to do Yamdeepdan video )
कार्तिकस्यते पक्षे त्रयोदश्यं निशामुखे । यमदीपं बहिर्दाद्यापमृत्युर्विनिष्यति ।
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टाळतो, स्कंदपुराणात असं म्हणतात.
प्रदोषकाळात यमदीप दान करण्याची परंपरा आहे. असं म्हणतात की, दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. या करिता प्रथम गव्हाच्या पिठात हळद घालून तो मळून घ्या. नंतर त्याचे दिवा बनवावा. काही ठिकाणी चारमुखी दिवा तयार करतात. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारं ठेवा की वातीची चार टोकं दिव्याच्या बाहेर आपणास दिसतील. आता त्यात तिळाचं तेल टाका.
प्रदोषकाळात अशा प्रकारे तयार केलेल्या दिव्याची रोळी, अक्षत आणि फुलांनी पूजा करा. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर थोडी साखर किंवा गव्हाचा ढीग करून त्यावर दिवा लावा. दिवा लावण्यापूर्वी तो पेटवून दक्षिण दिशेकडे पाहा, कारण दक्षिण दिशेला यमाचं स्थान मानलं जातं. काही जण घरातील दक्षिणेला हा दिवा ठेवतात. किंवा तेरा दिवे लावले लावून कुटुंबातील सदस्यांचे मृत्यूपासून संरक्षण करा.
यमदीपदान मुहूर्त - संध्याकाळी संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 8.30 वाजेपर्यंत करता येणार आहे.
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह |
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||
याचा अर्थ असा होती की, हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करतो. ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील.
पौराणिक काळात या बद्दल एक कथा आहे. त्यानुसार यमराजांला त्याच्या दूतांने विचारलं की, लोकांचं प्राण घेताना त्यांना दया येत नाही का? त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. तुम्ही सत्य सांगा असं म्हटल्यावर यमदूतांनी सांगितलं की, एकदा कुणाचातरी जीव घेताना त्यांचं मन भयभीत झालं होतं. हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता. त्या राज्याचा राजा त्याचा खूप आदर करत होता. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला.
त्यांना एका ज्योतिषशास्त्राने सांगितलं होतं की, लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल. हे ऐकून राजाने मुलाला गुहेत सोडलं आणि लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. काही काळानंतर एका मुलीनं त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केलं. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला.
यमदूतांनी सांगितलं की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचं हृदय भरून आलं होतं. काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. यमदूतांनी सांगितले की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचे हृदय भरून आले.
या प्रसंगानंतर यमराज म्हणला की, धनत्रयोदशीच्या दिवशी विधीवत पूजा आणि दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळेल. यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा लावला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)