बंगळुरु : आयपीएलच्या ११ व्या सीजनच्या दूसऱ्या दिवसाच्या लिलावात अफगानिस्तानचा स्पिनर मुजीब जरदानवरची बोली खास ठरली.
16 वर्षाचा जरदानवर किंग्स इलेवन पंजाबने 4 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतलं. अफगानिस्तानचा मुजीब आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात लहान खेळाडू असणार आहे.
मुजीब जरदान पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. यावर्षी अफगानिस्तानचे 11 खेळाडू लिलावात होते. ज्यामध्ये मुजीबसह तीन खेळाडुंचा आतापर्यंत लिलाव झाला आहे. मोहम्मद नबी आणि राशिद खानवर देखील बोली लागली. राशिदला 9 कोटींना सनराइजर्स हैदराबादने राइट टू मैचनुसार रिटेन केलं.