close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कर्नाटक प्रीमियर लीग फिक्सिंगप्रकरणी आणखी २ क्रिकेटरर्सला अटक

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Updated: Nov 8, 2019, 10:50 AM IST
कर्नाटक प्रीमियर लीग फिक्सिंगप्रकरणी आणखी २ क्रिकेटरर्सला अटक

मुंबई : कर्नाटक प्रीमियर लीगदरम्यान पैसे घेऊन मॅच फिक्स केल्याप्रकरणी कर्नाटकचा फर्स्ट क्लास क्रिकेटपटू सी. एम. गौतम आणि माजी खेळाडू अबरार काझी यांना अटक करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये तीन मॅच खेळणारा तसेच बेलारी टस्कर्स टीमचा कॅप्टन गौतम याच्यासह काझीला कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली. हे पथक गेल्या दोन सीझनमध्ये कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅच फिक्सिंगप्रकरणाची चौकशी करत आहे.

अतिरिक्त आयुक्त संदीप पाटील यांनी म्हटलं की, आम्ही केपीएल फिक्सिंग प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. हुबळी विरुद्ध बेल्लारी फायनलमध्ये यांनी फिक्सिंग केल्याची माहिती मिळाली आहे. हुबळीने हा सामना ८ रनने जिंकला होता. रन न करण्यासाठी त्याला २० लाख दिले गेल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बंगळुरू टीमच्या विरोधात आणखी एक सामन्यात फिक्सिंग केल्य़ाचा आरोप देखील त्याच्यावर होत आहे. गौतम या सीजनमध्ये गोवा टीममध्ये तर काजी मिजोरम रणजी टीममध्ये होता.

कर्नाटक आणि गोवाकडून रणजी खेळणाऱ्या गौतमने आयपीएलमध्ये बंगळुरु, मुंबई आणि दिल्लीकडून सामने खेळले आहेत. गौतमने ९४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. कर्नाटक टीमचा तो नियमित सदस्य होता. यावर्षी तो गोवा टीममध्ये गेला. 

याआधी बंगळुरु टीमचा खेळाडू निशांत सिंह शेखावत याला देखील अटक केली आहे. अटक केलेल्या तीन इतर व्यक्तींमध्ये बेळगाव पँथर्सचा मालक देखील आहे. बंगळुरू ब्लास्टर्सचा बॉलिंग कोच वीनू प्रसाद आणि फलंदाज विश्वनाथन यांना देखील अटक झाली आहे.