वर्ल्डकपसाठी या 3 ऑलराऊंडरची भारतीय टीममध्ये जागा निश्चित

पाहा कोण आहेत ते 3 खेळाडू

Updated: Oct 10, 2018, 03:41 PM IST
वर्ल्डकपसाठी या 3 ऑलराऊंडरची भारतीय टीममध्ये जागा निश्चित title=

मुंबई : आयसीसीने आगामी वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. वर्ल्डकप सुरु होण्यासाठी काही महिनेच बाकी आहेत. यंदाचा वर्ल्डकप 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. सगळ्या टीमने या वर्ल्डकपसाठी तयारी सुरु केली आहे. यासोबतच टीम इंडियाने देखील तयारी सुरु केली आहे.

यावर्षी टीम इंडिया 80 दिवस इंग्लंड दौऱ्यावर होती. या दौऱ्याचा फायदा भारतीय टीमला होणार आहे. पण इंग्लंडमध्ये कोणते खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात. याचा विचार भारतीय टीमची निवड समिती करत आहे. पण 11 पैकी 3 असे खेळाडू आहेत ज्यांची भारतीय टीममध्ये निवड निश्चित मानली जात आहे. 

पाहा कोण आहे ते खेळाडू

1.हार्दिक पांडया

टीम इंडियाच्या ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचच लक्ष आहे. तो वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करु शकतो. बँटींगसह बॉलिंगने ही तो कमाल करु शकतो. शेवटच्या ओव्हरमध्ये तो तुफानी खेळी करु शकतो. त्यामुळे याची संघात जागा निश्चित मानली जात आहे.

2. रविचंद्रन अश्विन

अश्विन टीम इंडियामधील एक अनुभवी खेळाडू आहे. सोबतच तो बॅटने देखील कमाल करु शकतो. अश्विनने अनेकदा टीमला गरज आहे तेव्हा मॅचमध्ये चांगली बँटींग केली आहे. अनेकदा त्याने भारतीय टीमला विजय मिळवून दिला आहे. 

3.रविंद्र जडेजा

जडेजाने बऱ्याच दिवसानंतर आशिया कपमध्ये जागा बनवली. आशिया कपमध्ये जडेजाने शानदार कामगिरी केली. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जडेजा वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा भाग असू शकतो.