आयपीएल 2018: ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत हे 3 खेळाडू

आयपीएल सीजन 11 मध्ये यंदा कोणता खेळाडू हिट ठरतो याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. लिलाव पूर्ण झाल्यानंतर आता कोणता बॅट्समन ऑरेज कॅपचा मानकरी ठरतो याबाबत लक्ष लागून आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2018, 02:23 PM IST
आयपीएल 2018: ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत हे 3 खेळाडू

मुंबई : आयपीएल सीजन 11 मध्ये यंदा कोणता खेळाडू हिट ठरतो याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. लिलाव पूर्ण झाल्यानंतर आता कोणता बॅट्समन ऑरेज कॅपचा मानकरी ठरतो याबाबत लक्ष लागून आहे.

कोण आहेत स्पर्धेत

१. सुरेश रैना :

या लिस्टमध्ये पहिलं नाव सुरेश रैनाचं आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त रन त्याच्या नावावर आहेत. रैनाने आयपीएलच्या 10 सीजनमध्ये 34.13 च्या रनरेटने 139.09 च्या स्ट्राइक रेटने  4540 रन बनवले आहेत. रैनाने कधी ऑरेंज कॅप नाही जिंकली पण २०१८ मध्ये तो ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार ठरु शकतो.

२. डेविड वार्नर :

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वार्नरने आयपीएल 2015 आणि 2017 मध्ये सर्वात जास्त रन केले. आयपीएलच्या मागच्या ४ सीजनमध्ये त्याने 500 हून अधिक रन केले आहेत. आयपीएलमध्ये त्याचा रनरेटन 40.54 तर 142 स्ट्राइक रेट होता. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये तो देखील या स्पर्धेत आहे.

३. विराट कोहली :

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त रन बनवण्याच्या यादीत अजून एक मोठं नाव आहे विराट कोहली यांचं. 2016 मध्ये विराट कोहलीने आयपीलएलमध्ये 973 रन बनवत ऑरेंज कॅप मिळवली होती. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो देखील यंदा ऑरेंज कॅप मिळवू शकतो.