IPL मध्ये या 8 धडाकेबाज खेळाडूंनी 2 वेगवेगळ्या संघाकडून ठोकले शतक

आयपीएलमधील शतकांचे किंग

Updated: Aug 13, 2020, 09:46 AM IST
IPL मध्ये या 8 धडाकेबाज खेळाडूंनी 2 वेगवेगळ्या संघाकडून ठोकले शतक

मुंबई : आयपीएल 2020 कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. पण आता चाहते प्रचंड उत्सुक आहेत, कारण इंडियन प्रीमियर लीग 2020 लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल सामने युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून रंगणार आहेत. आतापर्यंत या लीगमध्ये वेगवेगळ्या संघांच्या खेळाडूंनी अनेक उत्कृष्ट विक्रम नोंदवले आहेत. आयपीलमध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांनी दोन वेगवेगळ्या संघाकडून शतकं ठोकली आहेत.

1. वीरेंद्र सेहवाग 

वीरेंद्र सेहवागने 2011 साली दिल्ली कॅपिटलकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध 119 धावांची शानदार खेळी केली होती. यानंतर 3 वर्षानंतर 2014 मध्ये विरूने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 58 चेंडूत 122 धावा केल्या होत्या.

2. डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 4 शतके ठोकली आहेत. 2010 साली दिल्ली कॅपिटलकडून खेळताना वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 107 धावा केल्या. 2012 मध्ये पुन्हा एकदा त्याने दिल्लीकडून खेळताना 109 धावा केल्या. 2017 मध्ये वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून 126 धावा केल्या होत्या. 2019 मध्ये वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पुन्हा एकदा 55 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.

3. अ‍ॅडम गिलक्रिस्ट

गिलक्रिस्टने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियंसच्या विरुद्ध 47 बॉलमध्ये 109 रन केले होते. 2011 मध्ये त्याने किंग्स इलेवन पंजाबकडून खेळताना 55 बॉलमध्ये 106 रन केले होते.

4. एबी डिव्हिलियर्स

डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 3 शतके ठोकली आहेत. 2009  मध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 54 ब
लमध्ये 105 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्याने आरसीबीकडून खेळताना 59 बॉलमध्ये नाबाद 133 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2016 मध्ये डिव्हिलियर्सने गुजरात लायन्सविरुद्ध 129 रन्सची शानदार खेळी केली होती.

5. शेन वॉटसन

आयपीएलमध्ये वॉटसनच्या नावावर 4 शतके आहेत, त्यापैकी राजस्थान रॉयल्सकडून 2 तर चेन्नई सुपर किंग्जकडून 2 शतके आहेत. वॉटसनने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध आणि 2015 मध्ये केकेआरविरुद्ध शतक ठोकले होते. वॉटसनने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक ठोकले.

6. संजू सॅमसन

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2017 साली रायझिंग पुणे सुपरजायंट विरूद्ध 63 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक ठोकले आहे.

7. ब्रॅंडन मॅक्युलम

मॅक्युलमने आयपीएल 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 73 ब़ॉलमध्ये 158 धावांची खेळी केली. यानंतर मॅक्युलमने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत शतक ठोकले होते.

8. क्रिस गेल

गेलने आयपीएलमध्ये 6 शतके ठोकली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळताना गेलने 5 तर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 1 शतक ठोकले आहे. गेलने 2011 मध्ये आरसीबीसाठी दोन शतके ठोकली आहेत. 2012 मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरूद्ध शतक झळकावले. 2013 मध्ये त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध 175 धावांची नाबाद खेळी केली आणि 2015 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध शतकीय खेळी केली. यानंतर, 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना गेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले.