RR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं

RR vs RCB: 22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही. 

सुरभि जगदीश | Updated: May 23, 2024, 08:22 AM IST
RR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं title=

RR vs RCB: बुधवारी अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला. या सामन्यात 4 विकेट्सने बंगळूरूला नमवत क्वालिफायरच्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर दुसरीकडे एलिमिनेटरच्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रॉयल्स चॅलेंजर बंगळूरूचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. दरम्यान यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसकडून एक चूक झाली, ज्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला.

फलंदाजीमध्ये फ्लॉप झाली RCB

22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही. विराट कोहली, रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोरच्या यांना मोठी खेळी खेळता आली नाही. यावेळी आरसीबीने 173 रन्सचं आव्हान राजस्थानला दिलं होतं. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात संथ झालेली पहायला मिळाली.

आरसीबीने दिलेल्या 174 रन्सचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 45 रन्स केले. यावेळी रियान परागनं 36 रन्सचं योगदान दिलं. या सामन्यात हेटमायरनं 14 बॉल्समध्ये 26 रन्स ठोकले. रोव्हमन पॉवेल 16 रन्स करत टीमला विजय मिळवून दिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं 2 विकेट घेतल्या. अखेर राजस्थानने 4 गडी राखून सामना खिशात घातला.

फाफ ड्यु प्लेसिसची ही चूक पडली महागात

या सामन्यात फाफ डुप्लेसिसने मागील सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी दिली नाही. त्याचप्रमाणे करण शर्मा चांगली गोलंदाजी करत असताना त्याला अवघ्या 2 ओव्हरनंतर गोलंदाजी दिली गेली नाही. याचा परिणाम असा झाला की, 3 विकेट पडल्यानंतर पुढची विकेट रनआऊटमुळे मिळाली. शेवटी पॉवेल आणि हेटमायर यांनी आरसीबीच्या हातून सामना हिसकावून घेतला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने खास रेकॉर्ड केला आहे. कोहलीने आयपीएलच्या इतिहासात 8,000 रन्स पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या 252 व्या सामन्यात ही कामगिरी केलीये. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रोव्हमन पॉवेल प्लेऑफ सामन्यात सर्वाधिक कॅच घेणारा खेळाडू बनला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 झेल घेतले. त्याच्या आधी 6 वेगवेगळ्या खेळाडूंनी प्लेऑफ सामन्यात 3 झेल घेतले होते.