Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

BAN vs NED:  क्रिकेट हा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये संरक्षणासाठी ग्लोव्ह्ज, हेल्मेट, पॅडसह यांचा वापर केला जातो. हे गरजेचंही असतं कारण ज्यावेळी 150 ग्रॅम वजनाचा बॉल 140-150 किलोमीटर प्रतितास वेगाने तुमच्याकडे येतो तेव्हा दुखापत होऊ नये, यासाठी याचा वापर असतो.

सुरभि जगदीश | Updated: Jun 14, 2024, 11:29 AM IST
Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ title=

BAN vs NED: गुरुवारी टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बांगलादेशाने नेदरलँड्सचा 25 रन्सने पराभव केला. मात्र यावेळी बांगलादेशाची टीम फलंदाजी करत असताना एक मोठी घटना घडली. अवघ्या काही अंतराने फलंदाजाचा डोळा वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकी ही घटना काय घडली आहे ती पाहुयात.

क्रिकेट हा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये संरक्षणासाठी ग्लोव्ह्ज, हेल्मेट, पॅडसह यांचा वापर केला जातो. हे गरजेचंही असतं कारण ज्यावेळी 150 ग्रॅम वजनाचा बॉल 140-150 किलोमीटर प्रतितास वेगाने तुमच्याकडे येतो तेव्हा दुखापत होऊ नये, यासाठी याचा वापर असतो. नेदरलँड्सविरूद्ध झालेल्या बांगलादेशचा फलंदाज तनजीद हसनलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. क्रिकेटच्या मैदानावरील एक मोठा अपघात हेल्मेटमुळे टळला आहे. 

सेंट व्हिन्सेंटमध्ये दोन्ही टीम्समध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमने प्रथम फलंदाजी केली. बांगलादेशने पहिली विकेट लवकर गमावली होती पण त्याचा ओपनर तनजीद हसन स्फोटक फलंदाजी करत होता. मात्र फलंदाजी करत असताना जी घटना घडली ज्यामुळे त्याचं संपूर्ण क्रिकेट करिअर संपुष्टात आलं असतं. मात्र यावेळी नशीब सोबत होतं म्हणून तो वाचला.

हेल्मेटमुळे वाटला तनजीद हसन

बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये नेदरलँडचा गोलंदाज व्हिव्हियन किंग्मा गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर तनजीदला पुल शॉट खेळायचा होता, पण त्यात तो अपयशी ठरला. बॉल बॅटच्या वरच्या टोकाला लागला आणि थेट फलंदाजाच्या हेल्मेटच्या व्हिझरमध्ये अडकला. ही घटना घडली तेव्हा सर्वजण हैराण झाले. दुसरीकडे फलंदाजाच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती कारण चेंडू व्हिझरमध्ये अडकण्याऐवजी सरळ आत गेला असता तर त्याच्या डाव्या डोळ्यावर आदळला असता आणि मोठी दुर्घटना घडू शकली असती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

तनजीद नशीबवान होता की, गोलंदाजाचा बॉल जास्त वेगाने आला नाही. बॉल काहीसा हळू असल्याने तो व्हिझरमध्ये अडकला. जर तो त्याच्या डोळ्यावर आदळला असता तर मोठं नुकसान झालं असतं. अशावेळी त्याची कारकीर्दही संपुष्टात आली असती. डोळ्यात चेंडू लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा महान विकेटकीपर मार्क बाउचरची कारकीर्द संपुष्टात आली होती. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकच्या हेल्मेटच्या व्हिझरमध्येही बॉल अडकला आणि तोही दुखापतीतून बचावला. भारतीय वेगवान गोलंदाज वरुण आरोनचा वेगवान बॉल इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या व्हिझरमध्ये अडकला होता. त्यावेळी त्याच्या नाकाला दुखापत झाली आणि खूप रक्तस्त्राव झाल्याची घटना घडली होती.