Live सामन्यात Aaron Finch ची अंपायरला शिवीगाळ; निलंबनाची कारवाई होणार?

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य करताना कॅमेरात कैद झालाय. 

Updated: Oct 11, 2022, 12:01 PM IST
Live सामन्यात Aaron Finch ची अंपायरला शिवीगाळ; निलंबनाची कारवाई होणार? title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची T20 सिरीज खेळली जातेय. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य करताना कॅमेरात कैद झालाय. या सामन्यादरम्यान फिंचने अंपायरसमोर अपशब्द वापरले, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेमुळे फिंचला आयसीसीने फटकारलं असून त्याला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

आयसीसीने स्वतः या घटनेची माहिती आपल्या वेबसाईटवरून दिलीये. फिंचने आयसीसीच्या कलम 2.3 चे उल्लंघन केलंय. मात्क गेल्या 24 महिन्यांतील ऑस्ट्रेलियन कर्णधाराची ही पहिली चूक आहे ज्यामुळे त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. फिंचनेही आपली चूक मान्य केलीये.

स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड 

या घटनेदरम्यान, फिंच वेळ संपल्यानंतर रिव्ह्यू घेण्यासाठी अंपायरशी वाद घालताना दिसला. कर्णधार आणि अंपायरमध्ये थोडा वाद झाला. त्यानंतर फिंचने मैदानावर परतताना अंपायरला शिवीगाळ केली. यादरम्यान त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला. त्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इंग्लंडचा विजय

टी-20 मालिकेतील पहिला सामना इंग्लंड टीमने 8 रन्सने जिंकला. या सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अॅलेक्स हेल्स 84 आणि जोस बटलर 68 यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 208 रन्स केले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 73 रन्स केले. पण त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही.