...तर विराटला पुन्हा फॉर्ममध्ये येणं कठीण; AB de Villiers चा कोहलीला इशारा

विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत बोलताना एबी डीविलियर्सने त्याच्या मानसिकतेला जबाबदार ठरवलंय.

Updated: May 4, 2022, 11:13 AM IST
...तर विराटला पुन्हा फॉर्ममध्ये येणं कठीण; AB de Villiers चा कोहलीला इशारा title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. विराटच्या चाहत्यांसाठी ही फार चिंतेची बाब आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही विराटचा चांगला खेळ होताना दिसत नाहीये. अशातच आता विराटचा चांगला मित्र आणि माजी सहकारी एबी डीविलियर्स (AB de Villiers) ने त्याच्या खराब परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या विराटला चांगला खेळ दाखवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. त्याच्या खराब कामगिरीबाबत बोलताना एबी डीविलियर्सने त्याच्या मानसिकतेला जबाबदार ठरवलंय. कोहलीला खराब फॉर्ममधून पुनरागमन करणं आव्हानात्मक असल्याचंही एबी डिव्हिलियर्सचं मत आहे.

डीविलियर्सच्या मताप्रमाणे, कोणत्याही खेळाडूला खराब कामगिरीचा सामना करावा लागतो. मुळात हे खेळाडूच्या मानसिकतेवर अवलंबून असतं आणि तो खेळाडू यातून बाहेर पडण्यासाठी किती लवकरात लवकर यातून मार्ग काढतो.

विराटविषयी बोलताना तो म्हणाला, एक फलंदाज म्हणून तुम्ही खराब फॉर्मपासून केवळ एक किंवा दोन डाव दूर आहात. जर तो तुमच्याकडे येत राहिले तर मग त्यापासून मागे हटणं कठीण आहे. यामध्ये खरी लढाई ही मनामध्ये आहे. तुम्ही एका रात्रीत वाईट खेळाडू बनत नाही. विराटला देखील हे माहिती असेल आणि याची मलाही कल्पना आहे.

"मला वाटते की, ही तुमची विचार करण्याची आणि तुमचे मन सेट करण्याची पद्धत आहे. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला चांगलं मन आणि उर्जेची गरज असते आणि मगच तुम्हाला मार्ग सापडतो," असंही एबीने सांगितलं आहे.