यंदाच्या IPL मध्ये कोहली किती रन करेल? एबी डिव्हिलियर्सने केलं भाकीत

एबी डिव्हिलियर्सची भविष्यवाणी खरी ठरेल असं तुम्हाला वाटतं का? 

Updated: Mar 30, 2022, 04:47 PM IST
यंदाच्या IPL मध्ये कोहली किती रन करेल? एबी डिव्हिलियर्सने केलं भाकीत title=

मुंबई : बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटूने विराट कोहलीवर भाकीत केलं आहे. त्यांच हे भाकीत यंदाच्या हंगामात खरं होणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. 

विराट कोहलीबाबत हे भाकीत करणारा तो दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून खास मित्र एबी डिव्हिलियर्स आहे. त्याने कोहली यंदाच्या हंगामात 600 धावा करेल असं भाकीत केलं आहे. कोहलीनं RCBच्या पहिल्या सामन्यात 29 बॉलमध्ये एक चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 41 धावा केल्या. आयपीएलची सुरुवात कोहलीनं चांगली केली.

आयपीएलमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचूनही आयपीएलमध्ये RCB ला ट्रॉफी मिळाली नाही. विराटने आतापर्यंत सर्वाधिक आयपीएलमध्ये धावा 2016 च्या हंगामात केल्या होत्या. त्याने 973 केल्या होत्या मात्र गेल्या दोन वर्षांपासून तो फॉर्ममध्ये नव्हता. आता पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट चालताना दिसत आहे. 

विराट कोहलीचा बेस्ट फ्रेंड एबी डिव्हिलियर्सने आता कोहली यंदाच्या हंगामात 600 धावा करेल असं भाकीत केलं आहे. विराट कोहलीनं RCB चं कर्णधारपदही सोडलं आहे. सध्या तो फक्त बॅटिंगवर फोकस करणार आहे. 

बॅटिंगवर फोकस करत असल्याने त्याच्याकडून खूप चांगल्या अपेक्षा आहेत. विराट कोहली यंदाच्या हंगामात कोहली 600 हून अधिक धावा करेल भाकीत डिव्हिलियर्सने केलं आहे.