ILT20 League: 'या' स्टार खेळाडूची नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी वर्णी

आयपीएल 2023 साठीचे मिनी ऑक्शन येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. या ऑक्शनपुर्वी एका संघाने कर्णधार बदलला आहे. बॉलिवू़डचा बादशाह शाहरूख खानने नाईट रायडर्स (knight riders) संघासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. आता या खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. 

Updated: Dec 14, 2022, 05:36 PM IST
ILT20 League: 'या' स्टार खेळाडूची नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी वर्णी  title=

Abu Dhabi Knight Riders : आयपीएल 2023 साठीचे मिनी ऑक्शन येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. या ऑक्शनपुर्वी एका संघाने कर्णधार बदलला आहे. बॉलिवू़डचा बादशाह शाहरूख खानने नाईट रायडर्स (knight riders) संघासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. आता या खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. 

वेस्ट इंडिजचा सुनील नारायण आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर (Kolkatta knight riders) संघातून खेळतो. या ऑलराऊंडर खेळाडूवर आता मोठी जबाबदारी आली आहे. सुनील नारायणची (Sunil Narine) अबू धाबी नाईट रायडर्सने संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता तो अबू धाबी नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.  

हे ही वाचा : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान

 काय म्हणाला?

कर्णधारपद हे माझ्यासाठी वेगळे आव्हान असणार आहे. यासाठी मला संपूर्ण संघाला चांगले समजून घ्यावे लागेल. मी कर्णधारपदासाठी खूप उत्सुक असल्याचे अबुधाबी नाईट रायडर्सचा नवीन कर्णधार सुनील नारायण (Sunil Narine) याने सांगितले.  

मी नेहमीच माझ्या वैयक्तिक खेळावर लक्ष केंद्रित केले आहे, मी कधीही संपूर्ण संघावर लक्ष केंद्रित केले नाही, यामुळे माझ्यासाठी हे आव्हानात्मक असेल.या नव्या जबाबदारीसाठी मी खूप उत्सुक असल्याचे तो म्हणाला आहे. मी बराच काळ कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे, ते माझ्यासाठी कुटुंबासारखे आहे. संपूर्ण जगात नाइट रायडर्सचा कोणताही संघ असला तरी मला त्या संघाकडून खेळायला आवडेल, असेही तो म्हणाला.

जर तुम्ही अबुधाबी नाईट रायडर्सच्या संघाकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो आहे. मला संघातील बहुतेक खेळाडूंच्या भक्कम बाजूची जाणीव आहे. संघात अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत, या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा आम्ही घेऊ शकतो,त्यामुळे मी आत्मविश्वासाने भरलेलो असल्याचे सुनील नारायण (Sunil Narine) म्हणालाय. 

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkatta knight riders) हे माझ्या कुटुंबासारखे आहे. या संघासाठी खेळणे हा मजेशीर प्रवास होता.या स्पर्धेत खूप धमाल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान या स्पर्धेला 13 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.या स्पर्धेची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.