लाईव्ह सामन्यात चमत्कार; स्टंपला बॉल लागूनही अंपायरने Shreyas Iyer दिलं नाही आऊट!

टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना वेगळाच चमत्कार पहायला मिळाला. या प्रकाराने स्टेडियममधील सर्वजण हैराण झाले.  

Updated: Dec 14, 2022, 05:11 PM IST
लाईव्ह सामन्यात चमत्कार; स्टंपला बॉल लागूनही अंपायरने  Shreyas Iyer दिलं नाही आऊट! title=

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban 1st test) यांच्यात आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पहिला टेस्ट सामना खेळवला गेला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 6 विकेट्स गमावत 278 रन्स केलेत. चट्टोग्रामच्या (Chattogram) जहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू झालेल्या या सामन्यामध्ये टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना वेगळाच चमत्कार पहायला मिळाला. या प्रकाराने स्टेडियममधील सर्वजण हैराण झाले.  

फलंदाजीला फारशी चांगली सुरुवात झालेली नसताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) डाव सावरला. पहिल्या दिवसाच्या शेवटी 82 रन्सवर श्रेयस अय्यर नाबाद राहिलाय. मात्र अय्यरसोबत एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वच चाहत्यांना काही काळासाठी धक्का बसला होता.

सामना सुरु असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे श्रेयस स्वतः देखील हैराण झाला असेल. अय्यर 77 रन्सवर फलंदाजी करत होता. यावेळी 84 व्या ओव्हरच्या पाचवा बॉल स्टम्सना लागला आणि लाईट्सही पेटल्या. असं असूनही श्रेयस मात्र नॉट आऊट राहिला. तुम्हीही हे वाचून हैराण व्हाल, मात्र याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

बॉल स्टंपवर लागला, पण नॉट आऊट राहिला अय्यर

यावेळी अय्यरला नशीबाची साथ मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलरने योग्य पद्धतीने बॉल टाकला होता, यावेळी बॉल स्टंपला लागला, पण बेल्स उडाल्या नाहीत. त्यामुळे अंपायरने अय्यरला आऊट करार दिला नाही. बेल्सला धक्का लागला मात्र बेल्स न पडल्याने बांगलादेशाच्या गोलंदाजानांही चुकचुकल्या सारखं झालं. 

काय सांगतो नियम?

जर बॉल स्टंपला लागून बेल्स पडत नसतील तर फलंदाजाला आऊट करार देता येत नाही. यामुळे अय्यरला जीवदान मिळालं. 

एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव झाला

याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने कमान सांभाळत संघाला विजयाकडे नेले. या सामन्यात इशान किशनने द्विशतक तर विराटने शतक झळकावले.