Hardik Pandya : T20 World Cup आधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारताची खराब गोलंदाजी ही भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली. या सामन्यात भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वादळी खेळी केली. त्यामुळे भारताला 208 धावांचा डोंगर उभारता आला. मात्र, तरी देखील अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ राहिला.
भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्स खुश असल्याचं पहायला मिळतं. पाकिस्तानी नेटकरी भारतीय खेळाडूंना ट्रोल करताना दिसत आहेत. अशातच पाकिस्तानी एक्ट्रेस सहर शिनवारीने (Pakistani actress Sahar Shinwari) ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला भारतीयांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं.
पराभवानंतर देखील हार्दिकने (Hardik Pandya)खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी एक ट्विट केलं. त्यात त्याने, "आम्ही शिकतोय, आम्ही सुधार करू, आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद", असा सारांश मांडला. तर त्याने सामन्यातील काही फोटो देखील शेअर केले आहेत.
हार्दिकच्या ट्विटवर (Tweet) सहर शिनवारीने कमेंट केली. "प्लीझ 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला जाणारा सामन्यात पराभूत व्हा (INDvsPAk), यामुळे तुम्हाला खुप शिकायला मिळेल", असं सहर म्हणाली होती. त्यावर भारतीय क्रिकेट फॅन्स तुटून पडले. तुम्ही आधी तुमचं घर सांभाळा, शेजाऱ्यांचं नंतर बघा, अशा प्रकारच्या कमेंट्स सहरच्या ट्विटवर पहायला मिळाल्या आहेत.
Please lose next match to Pakistan on 23rd October you will learn more from it
— Sehar Shinwari (@SeharShinwari) September 20, 2022
दरम्यान, हार्दिक पांड्याने नंबर 5 वर खेळण्यासाठी येऊन वादळी खेळी केली. फक्त 30 चेंडूत पांड्याने 71 धावा चोपल्या. यात 7 चौकार तर 5 गगनचुंबी षटकाराचा देखील समावेश आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये पांड्याने 3 चेंडूवर 3 षटकार खेचत धावसंख्या 200 पार पोहचवली. मात्र, अखेरीस खराब गोलंदाजीमुळे भारताला अखेर सामना गमवावा लागला.