बंगळुरुच्या सलग 6 व्या पराभवानंतर नाना पाटेकरांचा व्हिडिओ व्हायरल

पराभवामुळे बंगळुरु टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.   

Updated: Apr 9, 2019, 06:53 PM IST
बंगळुरुच्या सलग 6 व्या पराभवानंतर नाना पाटेकरांचा व्हिडिओ व्हायरल title=

बंगळुरु : बंगळुरुची आयपीएलच्या 12 व्या पर्वाची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे बंगळुरुचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सलग 6 पराभवामुळे बंगळुरुने दिल्लीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दिल्ली टीमचा 2013 साली सलग 6 मॅचमध्ये पराभव झाला होता. या पराभवामुळे बंगळुरु टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. 

बंगळुरुच्या या पराभवाच्या मालिकेमुळे सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा क्रांतीवीर सिनेमातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 'रोज आते है, इस उम्मीद पर, आज जितेगे, कल जितेगे, परसो जितेगे, रोज हरते है'. हा डॉयलॉग असलेला क्रांतीवीर सिनेमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रदीप शर्मा ट्विटर युजरने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

 

सोशल मीडियावरील लोकांनी बंगळुरुची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका गब्बर नावाच्या युजरने ट्विटरवर बंगळुरु टीमची अक्षरक्ष: लाजच काढली आहे. बंगळुरुमध्ये 3 खराब गोष्टी आहेत. यात ट्रॅफिक, सांभर आणि बंगळुरु क्रिकेट टीम. असं त्याने आपल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे.

 

 

एका पठ्ठ्यानं तर विराटची बायको अनुष्काचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात एक फोटो हा तरुणपणीचा आहे. तर दुसरा हा म्हातारपणीचा आहे. बंगळुरुच्या विजयाची वाट पाहता पाहता अनुष्का म्हातारी झाली आहे. तरी बंगळुरु जिंकली नाही. असे त्याने आपल्या पोस्टमधून उपहासात्मकपण मांडले आहे.

 

 

टिकटॉ़कवर रडक्या तोंडाच्या मुलाच्या व्हिडिओची चांगली चलती आहे. बंगळुरुच्या पराभवामुळे त्याला देखील रडू आवरले नाही. तो देखील बंगळुरुच्या पराभवावर  ओक्साबोक्शी रडत आहे.

 

      <iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>