पोर्ट ऑफ स्पेन : टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे.
या मॅचमध्ये सेंच्युरी मारून अजिंक्य रहाणेनं राहुल द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजमध्ये वनडेत सेंच्युरी मारणारा अजिंक्य हा दुसरा भारतीय ओपनर ठरला आहे. याआधी राहुल द्रविडनं २००६साली हे रेकॉर्ड केलं होतं. जमैकामध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये भारतानं ५ विकेटनं विजय मिळवला होता.