फेसबूक फॉलोअर्सच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण?

अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे.

Updated: Jun 26, 2017, 07:07 PM IST
फेसबूक फॉलोअर्सच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण? title=

मुंबई : अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे. असं असलं तरी विराट कोहलीची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फेसबूक फॉलोअर्सच्या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. फेसबूकवर विराट कोहलीचे ३ कोटी ५७ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

फेसबूक फॉलोअर्सच्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींचे फेसबूकवर ४ कोटी २३ लाख फॉलोअर्स आहेत. फेसबूक फॉलोअर्सच्या यादीमध्ये विराटनं सलमानला मागे टाकलं आहे.