अजिंक्य रहाणेचा लेकीसोबतचा Cute Video

दोन महिन्याच्या आर्याचा व्हिडिओ 

Updated: Dec 14, 2019, 08:02 AM IST
अजिंक्य रहाणेचा लेकीसोबतचा Cute Video

मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू आपल्या व्यस्त शेड्युलमधून लेकीला वेळ देताना दिसतोय. खेळाडू अजिंक्य रहाणेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आर्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आर्या तिच्या मित्र परिवाराच्या गप्पा मारत असल्याचं अजिंक्य सांगतो. 

अजिंक्य रहाणे आर्याला या व्हिडिओत,'मंकी काकाला भेटायचंय? आर्या फ्रेंडला भेटल्यावर कशी करते?' असे प्रश्न आर्याला विचारतो तर ती त्याला हुंकारे देऊन प्रतिसाद देताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Very important discussion with Aarya about her friend 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अवघ्या दोन महिन्यांची असलेली आर्या या व्हिडिओत बाबाशी गप्पा मारताना दिसते. 4 ऑक्टोबर रोजी अजिंक्यची पत्नी राधिकाने धोपवकरने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजन सिंहने ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी संपूर्ण जगाला दिली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

यानंतर अजिंक्य रहाणेने 7 ऑक्टोबर रोजी लेकीचा पहिला फोटो शेअर करून तिचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. 'आर्या अजिंक्य रहाणे' असं नाव पोस्ट करून तिचा फोटो शेअर केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aarya Ajinkya Rahane 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य आणि राधिकाचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. दोघं एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखत होते. खूप काळ यांनी एकमेकांना डेट केलं आहे. अजिंक्यची राधिकाशी ओळख शाळेत झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं.