Ajinkya Rahane : सध्या देशात वर्ल्डकप स्पर्धेचे सामने खेळवले जातायत. अशातच देशातंर्गत सैयद मुश्ताक अली ट्रॉफी ( Syed Mushtaq Ali Trophy 2023 ) खेळवण्यात येतेय. यामध्ये 16 ऑक्टोबर रोजी हरियाणा विरूद्ध मुंबई यांच्यात इंदूर सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टेस्ट टीम इंडियाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane ) तुफानी खेळी पहायला मिळाली.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ( Syed Mushtaq Ali Trophy 2023 ) मुंबईची टीम अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळतेय. हरियाणाविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या टीमने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पावसाच्या प्रभावामुळे 18-18 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात आला. यावेळी हरियाणाच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत 18 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 147 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या टीमने 15.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून सामना 8 विकेट्सने जिंकला.
मुंबईकडून अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) कॅप्टन्स इनिंग खेळली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) 43 बॉल्समध्ये 3 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 76 रन्सची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या उत्तम खेळीच्या जीवावर मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला. शिवम दुबेनेही 20 बॉल्समध्ये 1 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 26 रन्सची नाबाद खेळी केली. या सामन्यात मुंबईचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 8 बॉल्समध्ये 12 रन्स करून बाद झाला.
या सामन्यात हरियाणा टीमने 5 बाद 147 रन्स केले. ज्यामध्ये हर्षल पटेलने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 27 बॉल्समध्ये 38 रन्स केले. , तर अंकित कुमारने 36 रन्सचं योगदान दिलं. कर्णधार हर्षित राणा 9 रन्स करून बाद झाला तर निशांत सिंधू 30 रन्सवर करून नाबाद राहिला. मुंबईकडून तनुष कोटियनने 3 तर मोहित अवस्थीने 2 विकेट्स घेतले.