David Warner Abused Umpire : लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (Austrelia vs Sri lanka) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 14 वा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर कांगारूंनी वर्ल्ड कपमधील विजयाचा नारळ फोडलाय. पहिल्या दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आपलं खात उघडता आलं आहे. त्यामुळे आता ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) देखील आनंदाचं वातावरण दिसतंय. ऑस्ट्रेलियासाठी आता आगामी सामने करो या मरो असे असणार आहेत. त्यामुळे कांगारूंनी टेन्शन देखील घेतलं. अशातच आता श्रीलंकेविरुद्ध खेळाडूंच्या चेहऱ्यावर आक्रमकता दिसून आली. काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) चक्क अंपायरला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता वॉर्नरवर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 210 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. मात्र, त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ लवकर बाद झाले. दिलशान मदुशंका याने तिसऱ्या ओव्हरमध्ये कांगारूंच्या नांग्या ठेचल्या. आक्रमक अंदाजात खेळत असलेला डेव्हिड वॉर्नर बाद झाला अन् त्याच ओव्हरमध्ये स्मिथचा पत्ता देखील कट केला. मात्र, वॉर्नर एलबीडब्लु बाद झाल्यानंतर त्याला संताप अनावर झाला. डेविड वॉर्नरला एलबीडब्ल्यू देण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यु घेतला. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर वॉर्नर जोरात ओरडला अन् काहीतरी बडबड केली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. वॉर्नरने त्यावेळी शिवीगाळ (David Warner Abused Umpire) केल्याचा समोर आलं आहे.
David Warner was not happy after an lbw decision was upheld despite a review. Should it be decided that his reaction amounted to "excessive, obvious disappointment with an umpire’s decision," then he could be in line for a Code of Conduct penalty.
— Wisden (@WisdenCricket) October 16, 2023
— Pappu Plumber (@tappumessi) October 16, 2023
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.