Amitabh Bachchan On Ritika Sajdeh : वर्ल्ड कप म्हटलं की रोहित शर्माच्या अंगात उत्साह संचारतो. 2015 असो वा 2019... वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी आपल्या फलंदाजीची झलक दाखवून दिलीये. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारताच्या पहिल्या तिन्ही सामन्यात रोहित शर्माने आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलं अन् भारताला विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन ठेवलं. रोहितच्या करियरमध्ये त्याची पत्नी रितिकाने त्याला भरपूर साथ दिलीये. महत्त्वाच्या सामन्यात रितिका स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येते. अशातच आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील रितिका आली होती. मात्र, तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रितिकाला शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.
क्रिकेट आणि अमिताभ बच्चन यांचं अनोखं नातं आहे. वर्ल्ड कपचे कोणतेही सामने अमिताभ बच्चन मिस करत नाहीत. प्रत्येक मॅच बघताना तेवढाच आनंद आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर असतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हाच आनंद तिनपट होतो. अशातच नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्याचा अमिताभ बच्चन यांनी टीव्हीवर भरपूर आनंद लुटला. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीत मी रितिकाला शोधत होतो, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट (एक्स पोस्ट) केलं. त्यात त्यांनी म्हटलंय की, रोहित शर्माचा आजचा विजय अप्रतिम होता. संपूर्ण देशाला आणि स्टेडियमला या जाणीव आहे. पण आदराने सांगावस वाटतंय की, मी गर्दीत तुझ्या पत्नीचा चेहरा शोधत होतो. तु खेळतोस तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खरा आनंद असतो, असं अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
T 4800 -
Rohit S @ImRo45 .. the victory tonight was magnanimous ; the entire Country and Stadium expressed the feel, in wild enthusiasm .. but with due respects, I always search for the face in the crowd, of your respected better half .. that happiness is the most genuine !— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 14, 2023
दरम्यान, रितिका सजदेह मुंबई इंडियन्सला देखील सपोर्ट करताना अनेकदा दिसली आहे. अतितटीच्या वेळी तिची क्रॉस होणारी हाताची बोटं तिचं रोहितवरील प्रेम दर्शवतात. भारतात सामना असो वा ऑस्ट्रेलियामध्ये... रितिका नेहमी रोहितला सपोर्ट करत आलीये. तर रोहित देखील मैदानात आपलं पूर्ण सामर्थ्य दाखवतो. आता वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाची जबाबदारी असल्याने त्याच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे.